105 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत समावेश, उर्वरित कर्मचार्‍यांना पुढील टप्प्यात सामावून घेणार

पनवेल महानगरपालिकेत काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 105 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे.

105 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत समावेश, उर्वरित कर्मचार्‍यांना पुढील टप्प्यात सामावून घेणार
अनाथ मुलींना दत्तक घेतलेल्या पालकांसाठी पनवेल मनपा 25 हजार रुपये देणार
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 10:14 AM

पनवेल : पनवेल महानगरपालिकेत (Panvel Municipal Corporation) काम करणार्‍या तत्कालीन ग्रामपंचायतींच्या 105 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे. नगरविकास खात्याकडून या प्रश्‍नासंदर्भातील जीआर काढण्यात आला असून पहिल्या टप्प्यात 105 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, उर्वरित कर्मचार्‍यांचा पुढील टप्प्यात समावेश होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (105 GramPanchayat employees added in the service of Panvel Municipal Corporation)

पनवेल महापालिकेची 1 ऑक्टोबर 2016 रोजी स्थापना झाल्यानंतर तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा महापालिकेत समावेश करण्यात आला. या ग्रामपंचायतींमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी महापालिकेत समावेश व्हावा या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केले होते. महापालिकेच्या या समावेशन प्रकियेला जिल्हा परिषदेकडून आवश्यक सहकार्य न मिळाल्यामुळे ही प्रक्रिया लांबली.

कर्मचारी समावेशनासाठी नगरविकास विभागाने कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मोठ्या विलंबानंतर 25 जानेवारी 2019 रोजी कोकण आयुक्तांनी नगरविकास विभागाला यांदर्भातील अहवाल दिला. अहवाल सरकारला सादर करूनही त्याबाबतचा निर्णय प्रलंबित होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर आज पहिल्या टप्प्यात 105 कर्मचार्‍यांचा महापालिकेच्या सेवेत समावेश करण्यात आला असल्याने कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पनवेल नगरपालिकेसह 68 गावांचा महापालिकेत समावेश

रायगडमध्ये 16 मे 2016 रोजी पनवेल नगरपालिका आणि परिसरातील तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, बोनशेत, पळस्पे, नेवाळी आदी 68 गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका स्थापन करण्यात आली होती. नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर पडणारा ताण लक्षात घेऊन पनवेल आणि परिसराचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल महापालिका स्थापन करण्याबाबत अभ्यास करण्यासाठी सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांनी सादर केलेला अहवाल नगरविकास विभागाने स्वीकारला. त्यानुसार पनवेल नगरपालिकेच्या हद्दीबाहेरच्या 68 गावांचा समावेश करून नवी महापालिका स्थापन करण्यात आली होती.

संबंधित बातम्या

पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार; पालकमंत्री अदिती तटकरे यांचे निर्देश

पनवेल मनपावर भाजपची एकहाती सत्ता, स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी

(105 GramPanchayat employees added in the service of Panvel Municipal Corporation)

Non Stop LIVE Update
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.