AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडला आंदोलनाची सर्वाधिक झळ, जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल

मराठा आंदोलनाचे लोण राज्यभर पसरलं आहे. मराठवाड्यात या आंदोलनाचे पडसाद सर्वाधिक उमटले आहेत. काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्य सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. कुणबी प्रमाणपत्रही देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही आंदोलक मागे हटायला तयार नाहीत.

बीडला आंदोलनाची सर्वाधिक झळ, जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल
Maratha quota stirImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 01, 2023 | 7:03 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलनाने हिंसक वळण घेतलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी आधी उपोषणाचं हत्यार उपसलं. त्यानंतर नेत्यांना गावबंदी करण्यात आली. आता तर आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ सुरू केली आहे. राजकारण्यांची घरे पेटवली जात आहेत. त्यांची वाहने अडवली जात आहेत. राज्यभरात आतापर्यंत 141 गुन्हे दाखल झाले आहेत. बीडला या आंदोलनाची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. बीडमध्ये जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. राज्यात मराठा आंदोलनाचे 141 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत 168 लोकांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात 146 आरोपींना 41 अ नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. संभाजीनगरमध्ये 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून 106 जणांना अटक करण्यात आली आहे.

बीडच्या घटनेची दखल

बीडमध्ये 20 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, या 20 पैकी सात गुन्हे हे जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे आहेत. बीडमध्ये गुन्हे कमी दाखल झाले असले तरी जाळपोळीच्या घटना अधिक झाल्या आहेत. अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या बंगल्यालाही आग लावण्यात आली होती. या सर्व घटनांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. खासकरून बीडच्या घटनांची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

इंटरनेट बंद

बीडमध्ये जमाव बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बीडमध्ये इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. बीडच नव्हे तर संभाजी नगर ग्रामीण आणि जालन्यातही इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बीडमधील तणाव अटोक्यात आणण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. ज्या ज्या ठिकाणी कायद्याचे उल्लंघन आणि जाळपोळ झाली, तिथे कारवाई करण्यात आली आहे. आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यामुळे आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. 7 हजार होमगार्डही बंदोबस्तावर आहेत. राज्यात हिंसाचारामुळे आतापर्यंत 12 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान, राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होतं. ज्यांनी ज्यांनी हिंसाचार केला, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाईल. 307 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तसेच फडणवीस यांनी मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहनही केलं होतं.

Follow Us
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा
झारखंडमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटलं, पोलिसांकडून पाण्याचा मारा, चपला-बूट...नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर..
मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट...
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? अमित शाह देणार उत्तर!
NEET पेपरफुटीवर सरकारची कोंडी? विद्यार्थी आंदोलनावर चर्चा, अमित शाह देणार उत्तर!
मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
Pratap Sarnaik | मराठी सक्तीबाबत प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! 105 दिवसांचा कालावधी...
राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक?
MNS | राज ठाकरेंचा अनिशा माजगावकरांना पुन्हा ग्रीन सिग्नल! मनसेत कमबॅक; भांडूपच्या राजकारणात नवं समीकरण?
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया
पंतप्रधांसोबच्या भेटीतील खास किस्सा! शरद पवारांबाबत काय म्हणाले नरेंद्र मोदी? अमोल कोल्हेंनी सगळंच सांगितलं
चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर....
Mumbai Local News | चाकरमान्यांसाठी सोमवार ठरला त्रासदायक! पश्चिमसह मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड; लोकल उशिराने