Omicron : चिंता वाढवणारी बातमी, दिवसभरात 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Omicron : चिंता वाढवणारी बातमी, दिवसभरात 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
कोरोना विषाणू

राज्यात आज दिवसभरात 8 जणांचा ओमिक्रॉन (Omicron) अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 8 रुग्णांपैकी 7 जण मुंबई (Mumbai)तर एक रुग्ण वसई-विरार(Vasai-Virar)मधला असल्याचं समजतंय. एकूण रुग्णांमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.

मंजिरी धर्माधिकारी

| Edited By: प्रदीप गरड

Dec 14, 2021 | 8:40 PM

मुंबई : राज्याची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात आज दिवसभरात 8 जणांचा ओमिक्रॉन (Omicron) अहवाल पॉझिटिव्ह आलाय. 8 रुग्णांपैकी 7 जण मुंबई (Mumbai)तर एक रुग्ण वसई-विरार(Vasai-Virar)मधला असल्याचं समजतंय. एकूण रुग्णांमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे.

राज्यातली आजची स्थिती काय?
राज्यात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या वाढत चाललीय. आकडा एकूण 28वर पोहोचलाय. काल सापडलेल्या रुग्णांच्या अपडेटनुसार, ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 9 जणांची आरटीपीसीआर (RTPCR)चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली होती. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 7, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, वसई-विरारमध्ये 1, नागपूर 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला.

‘घाबरून जाऊ नये’

काल लातूर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्णही दुबईवरुन भारतात आला होता. या 35 वर्षीय रुग्णात लक्षणं आढळून आली होती. लातूर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. परदेशातून आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल काल आल्यानंतर तो रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. हा रुग्ण औसा इथला रहिवासी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ब्रिटनमधल्या मृत्यूनंतर सावधानतेचा इशारा

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झालाय. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (UK Prime Minister Boris Johnson) यांनी ही माहिती दिलीय. या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागतंय.  30पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.

 

St worker strike : कामावर हजर न राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या बडतर्फ प्रक्रियेला सुरुवात-सूत्र

Raj Thackeray | लोक मला फुकट घालवत आहे, राज ठाकरेंनी बोलून दाखवली सल…

Maharashtra Vidhan Parishad Election Result: विधान परिषद निवडणूक भाजप जिंकली, पण घोडेबाजारही झाला, नवाब मलिकांचा आरोप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें