आदित्य ठाकरे यांची माहीममधील प्रचारसभा अचानक रद्द, नेमकं काय घडतंय?

मुंबईमधील दादर माहीम विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण ठाकरे कुटुंबातील तरुण चेहरा या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे.

आदित्य ठाकरे यांची माहीममधील प्रचारसभा अचानक रद्द, नेमकं काय घडतंय?
आदित्य ठाकरे यांची माहीममधील प्रचारसभा अचानक रद्द
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 7:41 PM

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची आजची माहीममधील सभा रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दादर माहीम विधानसभा मतदारसंघाची प्रचंड चर्चा आहे. कारण या मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे दादर माहीम मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी भूमिका भाजप नेत्यांनी घेतली होती. पण सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे अमित ठाकरे यांची सदा सरवणकर यांच्याविरोधातही लढाई होणार आहे.

दुसरीकडे माहीममध्ये ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे दादर माहीममध्ये तिरंगी लढत होत आहे. नुकतंच दोन दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची माहीममध्ये सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी कुटुंबाबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. आपण कुटुंबात कधी राजकारण आणत नाही, असं म्हटलं होतं. हे बोलत असताना त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीचं उदाहरण दिलं होतं.

गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी वरळीतून आदित्य ठाकरे हे उमेदवार होते. त्यावेळी 35 हजार मतं असताना आपण आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता, असं राज ठाकरे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरे यांची माहीममध्ये आज प्रचारसभा होती. या सभेत आदित्य ठाकरे आपले काका राज ठाकरे यांना उद्देशून काय भूमिका मांडतात? याकडे सर्वांचं लक्ष होतं. पण एका दुखद घटनेमुळे आदित्य ठाकरे यांची आजची माहीमची सभा रद्द करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे यांची सभा रद्द का झाली?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरे यांची माहीमधील सभा अचानक रद्द करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांची आज संध्याकाळी 7 वाजता माहीममध्ये ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभा होणार होती. पण ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख शिरोडकर यांच्या वडिलांचं निधन झाल्याने सभा रद्द करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांची जोगेश्वरी येथीलही सभा रद्द झाली आहे.

आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं
एकनाथ शिंदे दिल्लीत जाणार का ? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगितलं.
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली
बेईमानांचा पालापाचोळा उडाला, संजय राऊत-गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली.
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.