बँकेत खातेदाराला लुटलं, प्रकार सीसीटीव्ही कैद  

मुंबई : भरदिवसा बँकेत पैसे भरण्यासठी आलेल्या एका व्यक्तीला काही चोरट्यांनी चुना लावल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना शुक्रवारी (9 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कांदिवलीतल्या चारकोप येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली. नेमकं काय घडलं? 50 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यासाठी एक व्यक्ती आला होता. दरम्यान तीन अनोळखी लोक त्याच्या बाजूला आले […]

बँकेत खातेदाराला लुटलं, प्रकार सीसीटीव्ही कैद  
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : भरदिवसा बँकेत पैसे भरण्यासठी आलेल्या एका व्यक्तीला काही चोरट्यांनी चुना लावल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ही घटना शुक्रवारी (9 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कांदिवलीतल्या चारकोप येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत घडली.

नेमकं काय घडलं?

50 हजार रुपयांची रोख रक्कम जमा करण्यासाठी एक व्यक्ती आला होता. दरम्यान तीन अनोळखी लोक त्याच्या बाजूला आले आणि हातचलाखीने त्या व्यक्तीच्या 50 हजार रुपयातील 12 हजार रुपयांवर डल्ला मारत तिथून पोबारा केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, हे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्हीच्या आधारे सध्या आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

बँकेतच लुटीचा प्रकार घडल्याने बँक कर्मचाऱ्यांसह खातेदारांमध्ये काहीशी खळबळ माजल्याची स्थिती आहे.

बँकेत पैसे जमा करायला आल्यावर कुणाकडे पैसे मोजायला देणे अथवा फॉर्म भरण्यास सांगणे किती धोकादायक ठरू शकते, हे या घटनेवरुन समोर आल्याने, पोलिसांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अनेकदा बँकेत कुणी वृद्ध आल्यास, ते बाजूला असणाऱ्यांना पैसे मोजण्यास सांगतात. मात्र, बँकेत फारसा कुणी ओळखीचा नसल्याने चोरीच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणेच, जास्त उचित ठरते.

पाहा व्हिडीओ :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें