“भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पीडित कुटुंबांना दहा लाखांची मदत दया”

भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तसंच पिडीत कुटुंबांना दहा लाखांची मदत दया, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

भंडारा घटनेतल्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, पीडित कुटुंबांना दहा लाखांची मदत दया
प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 3:57 PM

मुंबई : भंडाऱ्यातल्या जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन प्रत्येक कुटुंबाला दहा लाखाचे अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी भंडारा घटनेचा शोक व्यक्त करत सरकारने प्रत्येक पिडीत कुटुंबाला दहा लाखाचे अर्थसहाय्य करावे, अशी मागणी केलीय. (Accuse the culprits in Bhandara incident of culpable homicide, help the victims with Rs 10 lakh Demand VBA)

भंडाऱ्याच्या दुर्दैवी घटनेत ज्यांची नवजात मुले गेली त्या कुटुंबीयांच्या दु:खात वंचित सहभागी असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील वंचितने केली आहे. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही जाहीर झालंय मात्र ही मदत तोकडी असून कमीत कमी दहा लाख रुपये प्रत्येक कुटुंबातील पालकांना देण्यात यावेत, अशी मागणी वंचितने केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करताना दोषींवर कठोर करवाई केली जाईल व आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही याची दक्षता घेण्याची गरज आहे. परंतु शासकीय रुग्णालयाकडे सरकारचे लक्षच नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू वॉर्डमध्ये मध्यरात्री दीडच्या सुमारास आग लागली. शॉट सर्कीटमुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी अंदाज व्यक्त केला आहे. मात्र याची सर्व बाजूने सखोल चौकशी करून या मध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे, असेही पातोडे म्हणाले.

या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला असून त्यातील तिघांचा आगीत होरपळून तर अन्य सात बालकांचा धुराने गुदमरून मृत्यू झाला आहे. ही घटना सरकारी आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणा व अनास्थेमुळे घडलेली दिसते. आगीच्या कारणांचा बोध घेऊन भविष्यात अशा घटना घडणार नाही यासाठी दक्षता व उपाययोजना अंमलात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची मागणी देखील वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

निष्काळजीपणा झाला असेल तर शिक्षा झालीच पाहिजे : राजेश टोपे

आम्ही घटना स्थळाला भेट द्यायला जातो आहोत. घटना अतिशय दुर्दुवी आहे , हृदयाला पिळवटणारी घटना आहे. बऱ्याच जणांच्या डेड बॉडी त्यांच्या परिवाराला देण्यात आल्या आहे , काहींवर अंतिम संस्कार सुद्धा झालेले आहेत. मृतकांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे. याची चौकशी डिटेलमध्ये करण्याच्या सूचना देण्यात आल्या, त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नेमकं काय घडलं, शॉर्ट सर्किट कसं झालं याची सगळी माहिती घेतली जात आहे. निष्काळजीपणा यात झाला असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. अशा घटना यापुढे घडणार नाही यासाठी सगळे ऑडिट केलं जाणार आहे. आम्ही त्या परिवारांना भेटून सांत्वन देण्याचा प्रयत्न करू. या घटनेतून खूप काही शिकण्यासारखं आहे त्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

(Accuse the culprits in Bhandara incident of culpable homicide, help the victims with Rs 10 lakh Demand VBA)

संबंधित बातम्या

Bhandara Hospital Fire | भंडाऱ्याच्या आगीनेही ‘लक्ष्मी’लाच गाठलं, नवजात बळींमध्ये बालिकाच कशा सापडल्या?

Bhandara Fire News LIVE | भंडारा आगप्रकरणात जो दोषी असेल, त्याला कडक शासन केलं जाईल : अजित पवार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.