Aditya Thackeray : जन्मपक्षात असं करू शकतात तर कर्मपक्षातही करतील, बंडखोरावंरून आदित्य ठाकरेंनी भाजपाला केलं सावध

विधानभवनात आज बहुमत चाचणी घेण्यात आली. यावेळी शिंदेगटाने भाजपासह बहुमत सिद्ध केले. शिंदे आणि भाजपा गटाचे आता 164 तर महाविकास आघाडीकडे 99चे संख्याबळ आहे. मात्र न्यायालयात सर्व बाबी प्रलंबित असताना अशाप्रकारचे बहुमत घटनाबाह्य आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray : जन्मपक्षात असं करू शकतात तर कर्मपक्षातही करतील, बंडखोरावंरून आदित्य ठाकरेंनी भाजपाला केलं सावध
शिवसेना नेते आदित्य ठाकरेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 2:48 PM

मुंबई : शिवसेनेतून बंड करून जे आमदार पळून गेले त्यांना शिवसेना संपवायची आहे. मात्र शिवसेना कधीही संपणार नाही, तर दुप्पट ताकदीने पुढे येवून भगवा फडकवेल, असा विश्वास शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत बोलत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंडखोर आमदारांवर आदित्य ठाकरे यावेळी बरसले. हे आमदार बंड करून इकडे तिकडे पळत आहेत. आत्ता सत्तेत आले, पण जेव्हा मतदारांसमोर जातील, तेव्हा त्यांना कळेल, आपल्या मतदारसंघातील मतदारांचे काय मत आहे ते, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तर कालची निवडणूक घटनाबाह्य होती. कायद्याला अनुसरून (Illegal) नव्हती, अशी टीकादेखील त्यांनी केली आहे. व्हीपचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची तयारीही शिवसेनेने केली आहे.

न्यायालयात जाणार शिवसेना

विधानभवनात आज बहुमत चाचणी घेण्यात आली. यावेळी शिंदेगटाने भाजपासह बहुमत सिद्ध केले. शिंदे आणि भाजपा गटाचे आता 164 तर महाविकास आघाडीकडे 99चे संख्याबळ आहे. मात्र न्यायालयात सर्व बाबी प्रलंबित असताना अशाप्रकारचे बहुमत घटनाबाह्य आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना आणि आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक पवित्र्यावरून आता शिवसेनेतर्फे पुढील पावले उचलले जाण्याची शक्यता आहे. न्यायालयात दाद मागितली जाणार असल्याचे समजते. आमच्या व्हीपचे उल्लंघन झाले आहे. यासंदर्भात याचिका दाखल करू. ज्यांनी कोणी व्हीपचे उल्लंघन केले, त्यांच्यावर कारवाई तर करणारच, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बंडखोरांवर बरसले आदित्य ठाकरे

‘निवडणुकीला आम्ही तयार’

बंडखोर आमदारांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे यांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 20 मेला बोलावून विचारले होते, की तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, त्याचा मी साक्षीदार आहे. एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेवरून हे सिद्ध होते, की ते आधीच फितूर झाले होते. जन्मपक्षात जर ते असे करू शकतात, तर कर्म पक्षातही करणार. त्यामुळे जिकडे ते गेले आहेत, त्यांनीही सावध राहावे, असा इशारा त्यांनी भाजपालादेखील दिला आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले. त्यावर विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले, की निवडणुकीला आम्ही तयार आहोत. दुप्पट ताकदीने शिवसेना पुढे येईल आणि भगवा फडकवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.