AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | Advt Sadavarte : ‘त्यांचं नाव काय आहे रे?’ … ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी सदावर्ते हे जनरल रावत यांच्याबाबत बोलण्याच्या तयारीत उभे होते. हातात माईकही घेतला. पण ते सुरुवातीलाच बुचकळ्यात पडले. आपण नेमके कोणाबाबत बोलणार आहोत, हेच त्यांना कळेनासे झाले.

VIDEO | Advt Sadavarte : 'त्यांचं नाव काय आहे रे?' ... ॲड. गुणरत्न सदावर्तेंचा व्हिडीओ व्हायरल
ॲड. गुणरत्न सदावर्ते
| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 11:28 PM
Share

मुंबई : तामिळनाडूतील कुन्नूर जिल्ह्यात घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ(सीडीएस) अर्थात तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांचे निधन झाले. जनरल रावत यांच्या अकाली निधनाबाबत संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत आहे. असे असताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन प्रकाशझोतात आलेले गुणरत्न सदावर्ते यांना मात्र जनरल रावत यांचे नावदेखील माहित नव्हते. एका व्हिडिओतूनच ही बाब उजेडात आली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

हातात माईक आणि सदावर्ते काही वेळ बुचकळ्यात!

जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लोक ठिकठिकाणी जनरल रावत यांच्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम घेत आहेत. ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनीही जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी सदावर्ते हे जनरल रावत यांच्याबाबत बोलण्याच्या तयारीत उभे होते. हातात माईकही घेतला. पण ते सुरुवातीलाच बुचकळ्यात पडले. आपण नेमके कोणाबाबत बोलणार आहोत, हेच त्यांना कळेनासे झाले. बाजूला जनरल रावत यांची प्रतिमा होती. मात्र त्यांचे नाव काय हेच त्यांना ठाऊक नव्हते. कॅमेऱ्यासमोरच ते अडखळले होते. मग त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना ‘त्यांचे नाव काय रे?’ असा प्रश्न केला. तिथल्या लोकांनी त्यांना जनरल रावत असे सांगितले.

पण त्यानंतरही ते पुढे बोलण्यास आले नाहीत. कारण जनरल रावत कोण होते? हेदेखील त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे जनरल रावत यांचे पूर्ण नाव आणि त्यांचे पद याबाबत जाणून घेण्यातच त्यांनी काही वेळ घालवला. कार्यकर्त्यांनी सदावर्तेंना जनरल बिपीन रावत यांचे नाव सांगितले. त्यावर सदावर्तेंनी पुन्हा त्यांना ‘कोण आहेत ते?’ असा प्रश्न केला. त्यावर जनरल बिपीन रावत हे तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख असल्याचे मागील कार्यकर्त्यांकडून कळल्यानंतर सदावर्तेंनी भाषणाला सुरुवात केली. सदावर्ते हे कॅमेऱ्यासमोर बुचकळ्यात पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यांच्या व्हिडीओवर सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. सदावर्ते यांनी स्वतःची अभ्यासू म्हणून उभी केलेली प्रतिमा, पण त्यांना सैन्य दलाबाबत महत्वाच्या गोष्टी माहित नसणे, याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर नाव चर्चेत

ॲड. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांचे नाव अधिक चर्चेत आले होते. महाराष्ट्र सरकारने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्गांतर्गत आरक्षण दिले होते. त्यावर मराठ्यांना दिलेले आरक्षण असंवैधानिक असल्याचा दावा करीत सदावर्ते यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. (Advt Gunaratna Sadavarten’s video asking the name of the army chief goes viral)

इतर बातम्या

VIDEO : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून गोपीचंद पडळकर-अनिल परब आमनेसामने

‘ये तो सिर्फ गुर्राना था, अभी दहाड बाकी है’, खासदार इम्तियाज जलील यांचा मुंबईतून ठाकरे सरकारला इशारा

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.