AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railways : मुंबईत रेल्वे स्टेशनवर लावणार हवेतून पाणी बनवणारं मशीन

अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकात हे मेघदूत नावाचे यंत्र बसवले जाणार आहे. तर इतर पाच रेल्वे स्टेशनमध्येही हे यंत्र असणार आहे. या मेघदूत यंत्राच्या माध्यमातून हवेतून पाणी निर्माण होणार आहे. सांद्रीभवन शास्त्राचा वापर करुनच हे यंत्र सभोवतालच्या हवेतून पाणी काढणार आहे. या अत्याधुनिक उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हणतात.

Indian Railways : मुंबईत रेल्वे स्टेशनवर लावणार हवेतून पाणी बनवणारं मशीन
मुंबई रेल्वे स्थानक
| Updated on: Sep 01, 2022 | 8:18 PM
Share

मुंबई : (Mumbai Railway) मुंबई रेल्वे स्टेशनवर वाढती प्रवाशांची संख्या आणि त्यांना मुलभूत सोई-सुविधा मिळवून देण्याचा (Railway Administration) रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न राहिलेला आहे. आता प्रवाशांना मुबलक पाणी मिळावे या हेतूने एक अनोखा फंडा राबवला जाणार आहे. रेल्वे स्थानकावर हवेतून पाणी तयार करणारे यंत्र हे बसवले जाणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट दूर होणार आहे. मुंबईतील 5 रेल्वे स्टेशनवर हे (Machine) यंत्र बसवले जाणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि पाण्याची गरज लक्षात घेता हा अनोखा फंडा राबवला जाणार आहे.

म्हणून गरज निर्माण झाली…

मानवी जीवनामध्ये पाण्याचे महत्व हे अनन्यसाधारण आहे. असे असतानादेखील पाण्याचा अपव्यय हा केलाच जोतो. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक मुख्य शहरांना देखील पाणीटंचाईला सामोरे हे जावे लागतेच. त्यापैकी मुंबई एक शहर आहे. मान्सूनच्या काळात अतिवृष्टी आणि सततचा पाऊस असला तरी मुंबईकरासाठी पाणी टंचाई ही नवीन नाही. शिवाय पाणीकपातीलाहा सामोरे जावेच लागते. अशी प्रतिकूल स्थिती असतनाच प्रवाशांना किमान रेल्वे स्टेशनवर तरी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून एक असे यंत्र बसवले जाणार आहे, जे हवेतून पाणी तयार करेल. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या तर निर्माण होणार नाहीच पण प्रवाशांची जागोजागी सोय होणार हे निराळेच.

जलनिर्मीत करणाऱ्या यंत्राचे नाव मेघदूत

अवघ्या काही दिवसांमध्ये मुंबईतील मध्य रेल्वे स्थानकात हे मेघदूत नावाचे यंत्र बसवले जाणार आहे. तर इतर पाच रेल्वे स्टेशनमध्येही हे यंत्र असणार आहे. या मेघदूत यंत्राच्या माध्यमातून हवेतून पाणी निर्माण होणार आहे. सांद्रीभवन शास्त्राचा वापर करुनच हे यंत्र सभोवतालच्या हवेतून पाणी काढणार आहे. या अत्याधुनिक उपकरणाला एडब्ल्यूजी असेही म्हणतात. एवढेच नाहीतर या उपकरणाला संयुक्त राष्ट्राने देखील मान्यता दिलेली आहे. मुंबईतील ठाणे आणि दादर येथेही ही उपकरणे बसवली जाणार आहेतच पण कुर्ला, घाटकोपर येथे प्रत्येकी एक तर ठाण्यात 4 उपकरणे बसवली जाणार आहेत.

असे होणार हवेचे पाण्यात रुपांतर

मेघदूत हे अत्याधुनिक उपकरण हे मैत्री अॅक्वाटेक प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलेले आहे. हवेतून पाणी घेण्यासाठी हे उपकरण अद्वितीय तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने वापर करते. जर का तापमान 18 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस असे असेल तर यामध्ये हे उपकरण 100 टक्के कार्य करते. तर एका दिवसाला 1 हजार लिटर पाणी तयार करते. त्यामुळे प्रवाशांची तर गैरसोय दूर होणारच आहे पण वेगळेपणही अुभवयास येणार आहे.

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.