“मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या”

राजपुतांना सरसकट आरक्षण द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे. (Rajput community demand reservation )

  • हर्षल भदाणे पाटील, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 12:40 PM, 28 Sep 2020
"मराठा आणि राजपुतांचं देशासाठी बलिदान, राजपुतांनाही सरसकट आरक्षण द्या"

नवी मुंबई : राज्यात मराठा समाजापाठोपाठ अन्य समाजही आरक्षणाची मागणी करताना दिसत आहे. त्यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा इशारा दिला जात आहे. यामध्ये मराठा, धनगर समाज प्रामुख्याने आरक्षण मागणी करत आहे, तर ओबीसी समाजाकडून आरक्षण बाधित राहावं किंबहुना मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको, अशी भूमिका घेतली आहे. (Rajput community demand reservation )

अशी परिस्थिती असताना आता राजपूत समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. राजपुतांना सरसकट आरक्षण द्यावे अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर 19 ऑक्टोबरला मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला आहे. राजपूत महामोर्चाचे प्रमुख अजयसिंह सेंगर (Ajaysingh Sengar) यांनी हा इशारा दिला.

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठ्यांना आरक्षण द्यावे किंवा आरक्षण पद्धत रद्द करुन, गुणवत्तेवर आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीला सेंगर यांनी समर्थन दिले आहे.

मराठा आणि राजपूत यांनी देशासाठी प्राणांचे बलिदान दिल्याची नोंद इतिहासात आहे. या देशाला गुलामीतून सोडविले. त्यामुळे मराठ्यांसोबत राजपुतांनाही आरक्षण देण्यात यावे, किंवा प्रत्येक जाती, प्रत्येक धर्मास वेगळे-वेगळे कायदे असणारे विषमता प्रधान करणारे सविंधानच बदला, असे सेंगर म्हणाले.

उदयनराजे भोसले काय म्हणाले? 

मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. साताऱ्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या भेटीनंतर उदयनराजेंनी मत व्यक्त केले. (MP Udayanraje Bhosle demands Merit based Reservation)

मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.

(Rajput community demand reservation )

संबंधित बातम्या 

सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी  

क्रांती होऊन लोक नेत्यांना मारुन टाकतील, मराठा समाज नेत्यांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावेल : उदयनराजे