Ambadas Danve: त्या आमदाराचा व्हिडिओ कॉल, नोटांची बंडलं… अंबादास दानवेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच कॅश बॉम्ब, मोठी खळबळ!

Ambadas Danve Cash Bomb: नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच उद्धव सेनेचे अंबादास दानवे यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला. सकाळीच त्यांनी ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात एक आमदार आणि दुसऱ्या फ्रेममध्ये नोटांची बंडलं दिसत आहेत. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे.

Ambadas Danve: त्या आमदाराचा व्हिडिओ कॉल, नोटांची बंडलं... अंबादास दानवेंकडून हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच कॅश बॉम्ब, मोठी खळबळ!
अंबादास दानवे, कॅश बॉम्ब
| Updated on: Dec 09, 2025 | 9:14 AM

Winter Session 2025: नागपूर हिवाळी अधिवेशनाला काल सुरुवात झाली. आज दुसऱ्या दिवशी सकाळीच उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी मोठा कॅश बॉम्ब टाकला. त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (Ambadas Danve Social Media X Handle) एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यात तीन व्हिडिओ आहेत. यामध्ये एका व्हिडिओमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तर इतर व्हिडिओपैकी एकात नोटांची बंडलं दिसत आहेत. विशेष म्हणजे X वरील पोस्टमध्ये अंबादास दानवे यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यावरून एकच खळबळ उडाली आहे. त्यावर महेंद्र दळवी यांनी टीव्ही ९ मराठीला प्रतिक्रिया दिली आहे.

बाकी सगळं ओक्के आहे

अंबादास दानवे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी कुणाचे नाव घेतलेले नाही. पण या व्हिडिओत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. तर दुसऱ्या व्हिडिओत नोटांची बंडलं आहे. हा एक व्हिडिओ कॉल असल्याचे समजते.

“या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?” असा सवाल अंबादास दानवे यांनी सरकारला विचारला आहे.

महेंद्र दळवी यांचा इशारा

हा एक व्हिडिओ कॉल असल्याचे दिसते. त्यात एकनाथ शिंदे यांचे आमदार महेंद्र दळवी दिसत आहेत. समोरील बाजूची व्यक्ती दिसत नाही. त्यात नोटांची मोठी बंडलं दिसत आहेत. या सर्व प्रकरणात आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल दानवेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे. तर याप्रकरणावर महेंद्र दळवी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.

“अंबादास दानवे यांनाी काही कामधंदा नाही. ते कुणाविरोधातही काही बोलत आहेत. कुणाला ब्लॅकमेल करणं त्यांना शोभत नाही. हा व्हिडिओ आपला नाही. ही संपूर्ण क्लिप दाखवा. एखाद्याला असं ब्लॅकमेल करणं योग्य नाही. त्यांनी डिबेटला यावं, माझी तयारी आहे. त्यांनी सत्यता दाखवावी, मी कायदेशीर पाऊलं उचलणार आहे. मी या ॲक्शनला रिॲक्शन देणार आहे. मी हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलणार आहे.”, असे महेंद्र दळवी यांनी प्रतिक्रिया दिली.