ठाकरे सिर्फ नाम काफी है…अमित ठाकरेंचे विद्यार्थ्यांनी केले जंगी स्वागत…महाविद्यालयातून मनविसे युनिटची स्थापना

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी ठाकरे महाविद्यालयांमध्ये आले होते. अमित ठाकरे आपल्या महाविद्यालयात आले आहे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दीकेली होती. त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल ताशांच्या गजरावर नाचत महाविद्यालय परिसरात जल्लोष करण्यात आला. 

ठाकरे सिर्फ नाम काफी है...अमित ठाकरेंचे विद्यार्थ्यांनी केले जंगी स्वागत...महाविद्यालयातून मनविसे युनिटची स्थापना
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 9:51 PM

मुंबईः सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे घराणे (Thackeray Family) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे केंद्रबिंदू राहिले. एकीकडे बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे निशाणा साधत आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेतून मतदारांशी संवाद साधत आहेत. त्याच ठाकरे घराण्यातील दुसरा चर्चेतील चेहरा म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांचे चिरंजीव अमित ठाकरेही (Amit Thackeray) दौऱ्यावर आहेत. मागली महिन्यात कोकणचा दौरा करुन आलेले अमित ठाकरे यांनी मुंबईतील काही महाविद्यालयात जाऊन युवकांबरोबर संवाद साधत आहेत. वांद्रे पूर्व विधानसभेतील चेतना महाविद्यालय, कलिना विधानसभेतील पाटक महाविद्यालयातील युवकांबरोब संवाद साधण्यासाठी गेले असता विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आनंदाने त्यांचे ढोल ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल ताशांच्या तालावर नाचत अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले.

ढोलताशांचे गजर आणि जल्लोष

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी ठाकरे महाविद्यालयांमध्ये आले होते. अमित ठाकरे आपल्या महाविद्यालयात आले आहे म्हटल्यावर विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दीकेली होती. त्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ढोल ताशांच्या गजरावर नाचत महाविद्यालय परिसरात जल्लोष करण्यात आला. अमित ठाकरे यांनी वांद्रे पूर्व विधानसभेतील चेतना महाविद्यालय, कलिना विधानसभेतील पाटक महाविद्यालय, विलेपार्ले विधानसभेतील साठ्ये महाविद्यालय आणि डहाणूकर महाविद्यालय येथे मनविसे युनिट स्थापना आणि त्या युनिटच्या फलकाचे अनावरण केले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, मनविसेचे पदाधिकारी आणि खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

राजकारणाविषयी मतं जाणून घेतली

अमित ठाकरे यांनी यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींबरोबर संवाद साधत त्यांना राजकारणाविषयीही त्यांची मतं जाणून घेतली. यावेळी विद्यार्थिनींनी अमित ठाकरे यांचा फोटो घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ढोलताशांच्या गजरात अनेक महाविद्यालयीन मुलांनी ठेका धरला होता. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठीही मोठी गर्दी करण्यात आली होती.

या महाविद्यालयातून झाले जंगी स्वागत

चेतना महाविद्यालय, वांद्रे पूर्व / ,पाटक महाविद्यालय, वाकोला, कलिना विधानसभा /, साठ्ये, डहाणूकर महाविद्यालय, विलेपार्ले पूर्व /, नॅशनल ७. एम एम के महविद्यालय, वांद्रे पश्चिम, वालिया महाविद्यालय, अंधेरी पश्चिम, कमला मेहता महाविद्यालय, वर्सोवा, पाटकर महाविद्यालय, गोरेगाव पश्चिम, मित्तल महाविद्यालय, मालाड पश्चिम, निर्मल महाविद्यालय, चारकोप, गोखले महाविद्यालय, बोरिवली पश्चिम, शैलेंद्र महाविद्यालय, दहिसर पूर्व, निर्मला महाविद्यालय, कांदिवली पूर्व, ठाकूर महाविद्यालय, मागाठणे, डी टी एस एस महाविद्यालय, दिंडोशी या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर अमित ठाकरेंनी संवाद साधला.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.