
Anjali Damania Criticized Dhananjay Munde: राज्यात घोटाळ्याचे जणू पेव फुटले आहे. एका पाठोपाठ एक घोटाळे समोर येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत मित्र पक्षात कुरघोड्या सुरू आहेत. तर दुसरीकडे विरोधकांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. राज्यात एकाचवेळी अनेक घडामोडी घडत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा टार्गेट केले आहे. या पक्षाच्या नेत्यांवर अत्यंत जहरी टीका केली आहे. त्यांनी अजितदादा आणि धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
पार्थ पवार यांच्यावर गुन्हा का नाही?
अंजली दमानिया यांनी पुणे जमीन घोटाळ्यात यंत्रणा पार्थ पवार यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून होत असल्याचे सूतोवाच त्यांनी केले. इथे आपल्यापैकी कोणी असतं तर आता त्याच्यावरती एफ आर दाखल झाला असता पण इथे पार्थ अजित पवार हे नाव आहे त्यामुळे एफआयआर दाखल होत नाही. एफआयआरमध्ये नाव घेतलं जात नाही. वेळ दिली पुन्हा मुदतवाढ देण्याचं सुरू आहे. या असंख्य प्रश्नांनी त्रास होतोय, असे मत मांडलं.
खर्गे समितीला बरेचशे पुरावे पाठवले आहेत. वीज बील पार्थ पवारांच्या नावाने आहे. दिग्विजय कुठेच नाही, पण त्याच्यावर अन्याय केला आहे. इओडब्ल्यूचे मिसाळ यांच्याकडे शितल तेजवानीचे सगळे पुरावे दिले आहेत. या सगळ्यांची चौकशी व्हायला हवी. कोण खरा पार्टनर आहे, सुत्रधार कोण? दिगिविजयला सहीचे अधिकार दिले होते. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली.
गौरी पालवे प्रकरणात महिला आयोगाने पाठपुरावा करावा
गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात तिचा आई बाबांना चेहरा पाहून दिला जात नव्हता. आत्ताच्या घटकेला कुणी राजकारण करू नये. दीर अजय आणि नणंद शीतल यांना चौकशीसाठी बोलावलं नाही. आयओने कुठलंच उत्तर दिलं नाहीये. आईचे असंख कॉल येत आहेत, महिला आयोग म्हणून खरंच पाठपुरावा करा. आई वडिलांचा दावा की तो मारहाण करायचा म्हणून. आईला सांगू नकोस नाहीतर आत्महत्या करेन असंही बोलायचा अशी माहिती दमानिया यांनी दिली. मला पंकजा मुंडेंनी विनंती करायची आहे की यात राजकारण करु नये. पीए होता म्हणून सॉफ्ट कॉर्नर देऊ नये, असे दमानिया म्हणाल्या.
धनंजय मुंडेंवर जहरी टीका
मला धनंजय मुंडे यांचं विधान ऐकून राग आला. संताप आला, ही व्यक्ती थर्ड क्लास आहे. एबसुल्युटली थर्ड क्लास आहेत. एवढं सगळं होऊनही जर आठवण येत असेल तर बोलायला शब्द नाहीत, अशा शब्दात दमानिया यांनी मुंडे यांच्यावर जहरी टीका केली. मुंडे यांना परळीच्या जनतेने निवडून देऊ नये असे आवाहनही दमानिया यांनी केले. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची आठवण काढल्यानंतर हा मुद्दा चांगलाच तापला. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे.
शेतकऱ्यांपर्यंत पैसा पोहचायला हवा
अजित पवार आणि रुपाली चाकणकर यांना सांगायचंय की ते पैसे तुमच्या काकांचे नाही, जनतेचे आहेत. खरंच या लोकांना सांगा की हा निधी जनतेच्या करांतून आला आहे. बोलताना भान ठेवा, फडणवीस त्यांची पाठराखण करतात. हे तेच फडणवीस आहेत का मला प्रश्न आहे, असे वक्तव्य दमानिया यांनी केले.