AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीवारीनंतरही शिंदेंना दाखवला कात्रजचा घाट, थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला, संभाजीनगरात भाजपचं सर्वात मोठं ऑपरेशन लोटस

Operation Lotus in Chhatrapati Sambhajinagar: एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीनंतरही ऑपरेशन लोट्स काही थांबलेले दिसत नाही. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे सेनाला मोठा झटका बसला आहे. शिंदे मराठवाड्यावर जातीने लक्ष ठेऊन असतानाच भाजपने शिंदेसेनेला कात्रजचा घाट दाखवला आहे.

दिल्लीवारीनंतरही शिंदेंना दाखवला कात्रजचा घाट, थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवारच फोडला, संभाजीनगरात भाजपचं सर्वात मोठं ऑपरेशन लोटस
शिंदेसेनेला धोबीपछाड
| Updated on: Nov 25, 2025 | 11:58 AM
Share

Shivsena Set Back in Phulambri: महायुतीत नगरपालिका निवडणुकीतील फोडाफोडीच्या राजकारणामुळे मोठे संकट उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदे यांची नाराजी समोर आली होती. त्यांनी या नाराजीतून दिल्लीवारी सुद्धा केली. पण त्यातून काही खास हाती लागल्याचे दिसून आले नाही. कारण राज्यात भाजप मित्रपक्षाला एकामागून एक धक्के देत असल्याचे दिसून येत आहे. असेच एक धक्कातंत्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री नगरपालिकेत दिसून आला. येथे शिंदे गटाचा हुकमी एक्काच भाजपने फोडला आहे. काय आहे अपडेट?

शिंदे सेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार फोडला

फुलंब्री नगरपरिषद निवडणुकित भाजपने चक्क शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपरिषदमधून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार असलेल्या आंनद ढोके यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आधीच भाजप आणि शिंदेंच्या यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सोहळ्यावरून वाद टोकाला पोहोचला आहे. त्यातच आता भाजपने शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच फोडला असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

युती मजबूत,लोक पर्याय शोधतात

फुलंब्रीतील नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपमध्ये गेल्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.अनेक ठिकाणी होत आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात आणि भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, आमचे कार्यकर्ते शिवसेनेत गेले आहेत, ऑप्शन लोकं शोधत असतात पण आमची युती मजबूत आहे, निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ, असे बावनकुळे म्हणाले.

जिल्ह्यात भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने

राज्यात सत्तेवर एकत्र बसलेली महायुती नगरपरिषद निवडणुकीत भंगली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील 6 पैकी 5 नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेना एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी या दोन्ही पक्षात रस्सीखेच दिसून येत आहे. या निवडणुका स्थानिक आमदारांनी प्रतिष्ठेची केल्याने राजकारण नवीन वळणावर पोहचले आहे.

सहा नगर पालिकेत महायुतीत द्वंद

सिल्लोड : शिंदेसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर, स्थानिक नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याच्याविरोधात भाजपने मनोज मोरेलू यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

फुलंब्री : भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांनी एकला चलो रेचा नारा देत फुलंब्री नगरपालिका निवडणुकीत मित्र पक्षांना थेट संदेश दिला आहे. शिंदे सेनेने आनंदा ढोके यांना निवडणूक रिंगणात उतरवले खरे, पण त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत कमळ हाती धरलं आहे.

गंगापूर : गंगापूर आणि खुलताबाद नगर पालिका निवडणूक आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी महत्त्वाची आहे. गंगापूरमध्ये भाजपकडून प्रदीप पाटील हे मैदानात आहेत. तर शिंदेसेनेने ऋषिकेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

खुलताबादः खुलताबादमध्ये भाजपने परसराम बारगळ यांना उमेदवारी दिली, तर बाबासाहेब बारगळ हे शिंदेसेनेचे उमेदवार आहेत.

वैजापूर: आमदार रमेश बोरनारे यांनी पत्ते टाकले आहेत. त्यांचे बंधू संजय बोरनारे हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. उद्धवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढविणारे दिनेश परदेशी यांना बोरनारे विरोधात भाजपने उमेदवारी दिली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून संजय जाधव निवडणूक रिंगणात आहे.

कन्नड : कन्नडमध्ये भाजपने उमेदवार दिला नाही. मात्र, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वाती कोल्हे आणि शिंदेसेनेच्या अनिता कवडे हे आमने-सामने आहे.

पैठण: खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांना त्यांचे वर्चस्व सिद्ध करायचे आहे. शिंदेसेनेकडून विद्या कावसानकर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत, तर मोहिनी सूरज लोळगे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.