AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मंत्री व्हायच्या तंद्रीतच यांचे अपघात होतात?, अरविंद सावंत यांची शिंदे गटावर टीका

मग, सकाळी कोणतही मोटरसायकल आडवी येते. कोण कुठं आडवा येतो. तंद्रीत असतात ना. गाड्या यांना उडवितात. मंत्रीपद केव्हा मिळेल, या सगळ्या तंद्रीत ही लोकं आहेत.

'मंत्री व्हायच्या तंद्रीतच यांचे अपघात होतात?, अरविंद सावंत यांची शिंदे गटावर टीका
अरविंद सावंत
| Edited By: | Updated on: Jan 15, 2023 | 4:09 PM
Share

मुंबई : अकोला येथे उद्या शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी अरविंद सावंत (Arvind Sawant) जाणार आहे. यासंदर्भात बोलताना अरविंद सावंत म्हणाले, यापूर्वी यवतमाळ (Yavatmal) येथे मोर्चा काढला होता. आता अकोला येथे जाणार आहे. शेतकऱ्यांची टिंगलटवाळी सुरू आहे. विमा कंपन्या आणल्या. मी लोकसभेत बोललो ही प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे की, फसगल विमान योजना आहे. गरीब जनतेला आम्ही विमा काढला म्हणून सांगणार. केंद्र सरकार ४९ टक्के प्रिमीयम भरणार. राज्य सरकार ४९ टक्के भरणार. शेतकरी दोन टक्के भरणार. हे सर्व भरल्यानंतर विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांचे दोन टक्के पण निघाले नाही. ५२ रुपये विमा काही जणांना मिळाला. येवढी हेटाळणी करता तु्म्ही, असं म्हणून अरविंद सावंत यांनी विमा कंपन्यांवर तोफ डागली.

राज्यात चक्रीवादळ आलं. नैसर्गिक आपत्ती आली. अतिवृष्टी झाली. त्यांना काय दिलासा दिला तुम्ही त्यांना, असा सवालही अऱविंद सावंत यांनी विचारला.

तुम्ही असे कसे वागता

पूर्व विदर्भात १२ तास वीज पुरवठा केला जातो. पश्चिम महाराष्ट्राला आठ तास वीज पुरवठा तोही रात्री. तुम्ही असे कसे वागता, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी विचारला. यासाठी उद्या अकोला येथे मोर्चा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

कारवाया या मराठी माणसावर सुरू आहे. भिकारी महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर कारवाया कशा करता. राणे क्युबवर नो कॉमेंट्स, असं त्यांनी म्हंटलं.

नेते मंत्रीपदाच्या तंद्रीत असतात

महापालिका निवडणुका येत आहेत. अशावेळी उद्या सकाळी माझं मंत्रीपदात नाव आहे का, अशा तंद्रीत नेते असतात. पण, सकाळी कळतं अरे नावचं नाही. मग, सकाळी कोणतही मोटरसायकल आडवी येते. कोण कुठं आडवा येतो. तंद्रीत असतात ना. गाड्या यांना उडवितात. मंत्रीपद केव्हा मिळेल, या सगळ्या तंद्रीत ही लोकं आहेत. त्यातून केव्हा बाहेर पडणार माहीत नाही, अशी टीकाही अरविंद सावंत यांनी केली.

राज्यातील संक्रात जावी

राज्याचा स्वाभिमान नाही. पाठीत सुरा खुपसणाऱ्यांना शुभेच्छा द्यायच्या कशा. नाही निर्मळ मन, काय करील साबण, असं तुकाराम महाराज म्हणतात. नाही निर्मळ मन, तर काय करील तीळगूळ, असं मी तयार केलं, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. तीळसंक्रांतीच्या शुभेच्छा या सर्व जनतेला दिल्या पाहिजे. सध्या राज्यावर संक्रांत आहे. या संक्रांत पासून संक्रात जावी, येवढी मनापासून शुभेच्छा.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.