राजकीय अस्मितेचा धंदा बंद करा; परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून शेलार शिवसेनेवर गरजले?

परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याचे सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असल्याची टीका भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे.

राजकीय अस्मितेचा धंदा बंद करा; परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून शेलार शिवसेनेवर गरजले?
आशिष शेलार, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 8:36 PM

मुंबई : परप्रांतियांची नोंद ठेवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य असंवेनशील असल्याचे सांगत प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असल्याची टीका भाजप नेते आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. (Ashish Shelar Attacks on Shivsena over outsiders)

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर आमचा शंभर टक्के आक्षेप असून गुन्हा आणि पीडितेबाबत असंवेदशीलता दाखवणारं हे वक्तव्य आहे. प्रत्येक विषयावर अस्मितेचा राजकीय धंदा शिवसेनेने सुरु केला असून वाढत्या गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकांचं लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे.

राष्ट्रीय नागरीक नोंदवही (NRC) ला शिवसेनेचा विरोध आहे मग परराज्यातील नागरिकांची नोंदवहीचा पुरस्कार कसा करता? असा सवाल करत नौटंकी बंद करुन NRC, CAA बाबत शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ॲड. शेलार यांनी केली. गुन्हेगारीवर बोलण्याऐवजी मुख्यमंत्री विघटनवादी भूमिका घेत आहेत, असे सांगत रिक्षाचा वापर झाला म्हणून परराज्यातील लोकांची नोंदवही, उद्या जर एसटीचा वापर झाला तर गावातल्या लोकांची नोंदवही करणार का? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेने राजकीय अस्मितेचा धंदा बंद करुन गुन्हेगारीमुक्त मुंबईकडे लक्ष द्यावं, असा सल्ला त्यांनी दिला.

बालहट्टापायी मुंबईची प्राथमिकता बदलली

पेंग्विनच्या टेंडरबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ॲड. आशिष शेलार म्हणाले, बालहट्टापायी मुंबई शहराची प्राथमिकता महापौर आणि शिवसेनेने बदलली आहे. 437 स्वे किमीच्या मुंबईतील 2055 किमीवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्येक वॅार्डला 2 कोटी म्हणजे 1 कोटी 40 लाख मुंबईकरांसाठी फक्त 48 कोटी खर्च करणार पण तेच एका पेग्विंनसाठी 15 कोटी खर्च करणार आहेत. यावरुन प्रशासकीय रचना बालहट्टासाठी कोणत्या थराला जाऊ शकते हे दिसतंय. यात मुंबईकरांच्या हिताचा विचार नाही आहे. पेग्विंनमुळे आमदनी वाढली असं आयुक्तांचं वक्तव्य म्हणजे बेशरमपणाचा कळस असल्याची टीका करत असच असेल तर पेग्विंन आणा आणि तुमच्या खुर्च्या खाली करा असे त्यांनी सुनावले.

राज्यात कट कारस्थाने शिजत असताना महाराष्ट्र एटीएस झोपलंय का?

नवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरु असताना महाराष्ट्र राज्याच दहशातवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का?, असा संतप्त सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतय असा आरोपही त्यांनी केला.

दिल्लीती सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यातील एकजण धारावीतील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. नॅान कॅाग्निजेबल ऑफेन्समधे केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलिस, पत्रकारांना हात नाही, पाय लावू अशी भाषा करणारे पोलिस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलिस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते? हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असं राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

इतर बातम्या

मोठी बातमी! राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तायवाडे राजीनामा देणार, 27 टक्के आरक्षणासाठी केंद्राशी संघर्ष करणार

OBC Reservation: सरकारच्या अध्यादेशानं नेमकं किती टक्के आरक्षण ओबीसींना मिळणार? भुजबळांनी टक्केवारीच सांगितली

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस, ‘आमचा खड्डेमय रस्ता बांधणाऱ्या इंजिनिअरला सोडून इतर सर्वांना इंजिनिअर्स डे च्या शुभेच्छा’

(Ashish Shelar Attacks on Shivsena over outsiders)

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.