नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा, आशिष शेलार यांची मागणी

वाब मलिक यांनी यंत्रणांमधील ज्यांच्यावर आरोप केले ते गंभीर आहेत शिवाय ते सरकारची ढाल पुढे करून कोर्टासमोर जात नाहीत. पोलीस यंत्रणा समोर जात आहेत.

नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा, आशिष शेलार यांची मागणी
ashish shelar

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंत्रणांवर केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्या सर्वांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. नवाब मलिक यांनी यंत्रणांमधील ज्यांच्यावर आरोप केले ते गंभीर आहेत शिवाय ते सरकारची ढाल पुढे करून कोर्टासमोर जात नाहीत. पोलीस यंत्रणा समोर जात आहेत, ना शपथेवर कोर्टासमोर काही दावा दाखल करीत आहेत , आणि आठ महिने ती माहिती त्यांच्याकडे होती, लपवली. त्यामुळे माननीय नवाब मलिक यांची आणि त्यांनी आरोप केले त्या यंत्रणामधील लोकांची सुद्धा नार्को टेस्ट व्हावी. राज्य सरकारने दोघांची टेस्ट करावी. किंबहुना नार्को पासून आरोप करणाऱ्यांना लपवालपवी करणाऱ्यांना आणि ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याला या दोघांना समान पद्धतीने राज्य सरकारने वागवलं नाही तर यात राज्य सरकारमध्ये बसलेल्या अन्य लोकां विषयीचा संशय बळावेल. म्हणून दोघांचीही टेस्ट करा, समान न्याय द्या, अशी मागणी शेलार यांनी केली.

तुम्हाला ही माहिती आधीच होती का?

आर्यन खानला अटक झाल्यानंतर जी माहिती मंत्री महोदय देत आहेत याचा बहुतांश गोष्टी आणि माहिती या आर्यन खान यांना झालेल्या अटकेनंतरच्या नाहीत. ही सर्वसाधारण दिलेली माहिती आहे. तुम्ही माहिती लपवण्यासाठी शपथ घेतली होती का? माहिती लपवण्याचे कारण काय? याचे उत्तर मलिक यांनी द्यायला हवे. ही माहिती नवाब मलिक यांचा जावई आठ महिने अटकेत असताना त्यांना होती ना? तुम्ही ती लपवून का ठेवली? राज्यपाल महोदयां समोर तुम्ही काय शपथ घेतली. गुन्हे, गुन्हेगारी आणि गुन्हेगार संबंधात माहिती लपवण्याची शपथ आपण घेतली होती का? ही बाब आता राज्यपाल महोदयांनी तपासला पाहिजे. आणि याचे उत्तर मंत्री नवाब मलिक यांनी दिलं पाहिजे. त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग केला असून गुन्हेगारी आणि गुन्हा कार्यपद्धती संबंधीची माहिती लपवणे हा फौजदारी गुन्हा आहे का? याबद्दलची सुद्धा स्पष्टता झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

वानखेडेंना प्रमाणपत्रं देण्याचं काम नाही

सुरुवातीला आम्ही पुन्हा एकदा स्पष्ट करतो समीर वानखेडे यांना चारित्र्याच प्रमाणपत्र देणं हे भाजपचं काम नाही. ड्रग्जच्या विरोधात बिनतोड कारवाई केलीच पाहिजे. यात कोणाचाही मुलाहिजा ठेवण्याची आवश्यकता नाही, हीच भाजपची मागणी आहे. त्यामुळे मुद्दाहून विषय कुठेतरी भरकटत नेण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी करु नये, असंही त्यांनी सांगितलं.

कारवाई झालीच पाहिजे

जिथे चरस, गांजा ड्रग्ज आणि त्यांच्या भाषेतला हर्बल तंबाखू कितीही प्रमाणात सापला आणि तो कायद्याने गुन्हा असेल तर कारवाई झालीच पाहिजे. त्याचं मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. ड्रग्ज अथवा तस्सम गोष्ट मिळाली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. कुणाचाही मुलाहिजा न ठेवता ही कारवाई व्हावी, असंही ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

पंढरपूरमध्ये हरले पण देगलूरमध्ये जिंकले, वाचा, आघाडीच्या विजयाची पाच कारणं

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

Dadra Nagar Haveli Election Result 2021 LIVE: शिवसेनेचं दिवाळीला सीमोल्लंघन, कलाबेन डेलकर यांचा 50 हजार मतांनी विजय

(ashish shelar demand nawab malik’s narcos taste)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI