AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला?, पालिकेतही वसुली आहे का?; शेलारांचा सवाल

मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? (ashish shelar slams shiv sena over bmc officer promotion issue)

पालिकेच्या 132 अधिकाऱ्यांच्या बढतीचा प्रस्ताव शिवसेनेने का अडवला?, पालिकेतही वसुली आहे का?; शेलारांचा सवाल
आमदार आशिष शेलार, भाजप
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 10:16 AM
Share

मुंबई: मुंबई महापालिकेतील एससी, एसटीच्या 132 अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला घेरलं आहे. या अधिकाऱ्यांच्या बदल्या का रखडवल्या आहेत? मंत्रालयातली बदल्यांप्रमाणे महापालिकेतही वसुली केली जात आ हे का?, असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. (ashish shelar slams shiv sena over bmc officer promotion issue)

आशिष शेलार यांनी दोन ट्विट करून हा सवाल केला आहे. मुंबई महापालिकेतील अनुसूचित जाती, जमातीसह आरक्षणांच्या रिक्त पदांवर महापालिकेत सेवेत असलेल्या 132 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा प्रस्ताव स्थापत्य समितीत मंजूर झाला. पण 4 सर्वसाधारण सभा घेऊनही सत्ताधारी शिवसेनेकडून या प्रस्तावाला मंजुरीसाठी विलंब का करण्यात येतोय?, असा सवाल शेलार यांनी केला आहे. चिटणीस पदावर शुभांगी “सावंत” यांना डावलून संगिता “शर्मा” यांना बढती देण्यात आली आहे. आता 132 मराठी अधिकाऱ्यांना पदोन्नती देताना पुन्हा अडवणूक करण्यात आली आहे. मंत्रालयातील बदल्यांप्रमाणे पालिकेत पण वसुली? मुंबईकर हो, हे पहा… अवतार मराठी माणसाच्या कैवाऱ्यांचे(?), मराठी अधिकाऱ्यांकडून वसुली करणाऱ्यांचे!, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

केंद्राकडे पाठपुरावा करा

दरम्यान, पालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवीधर व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात 50% जागा वाढविण्यासाठी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे तातडीने अर्ज करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा. तसेच सदर प्रवेश क्षमता वाढ तातडीने लागू व्हावी यासाठी Medical Council of India आणि पंतप्रधान कार्यालयाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी भाजपा प्रवक्ते व नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त ( पश्चिम उपनगरे ) यांच्याकडे नुकतीच केली आहे.

तातडीने अर्ज करा

केंद्राने संपूर्ण देशात 10 हजार हून अधिक वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्यासाठी महत्वाकांक्षी योजना सन 2015 साली जाहीर केलेली आहे. या योजने अंतर्गत ज्या वैद्यकीय महाविद्यालयांना 10 वर्षे झालेली आहेत अशा सर्व शासकीय / महापालिका / खाजगी महाविद्यालयांनी अर्ज केल्यास अटी व शर्तींच्या अधिन राहून 50 % प्रवेश क्षमता वाढवुन देण्याचे धोरण जाहीर केले आहे. मुंबई महानगरपालिकेची वैद्यकीय महाविद्यालये 50 वर्षाहून अधिक जूनी आहेत. परंतू, यापैकी केवळ लोकमान्य टिळक, शीव रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयाने वर्ष 2015 मध्ये 50 % जागा वाढीसाठी अर्ज करुन वर्ष 2016 पासून पदवीधर अभ्यासक्रमासाठी 100 ऐवजी 150 जागा वाढविण्यास परवानगी मिळविली आहे. मात्र दुर्देवाने महापालिकेच्या अन्य वैद्यकीय महाविद्यालयातून 50% प्रवेश क्षमता वाढीसाठी साधा अर्जही केला गेला नाही ही बाब मुंबईतील वैद्यकीय क्षेत्राच्या दृष्टीने गंभीर व दुर्देवी आहे, असेही शिरसाट म्हणाले. तसेच या संदर्भातील पुर्वानुभव लक्षात घेता महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी जातीने लक्ष घातल्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयांतील ढिम्म प्रशासन व प्रशासकीय अधिकारी हलणार नाही असे त्यांनी सांगितले. (ashish shelar slams shiv sena over bmc officer promotion issue)

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडे म्हणाले होते, आमच्या बहिणीने तर चिक्कीचे पैसे खाल्ले, आता हायकोर्ट म्हणतं अजून FIR का नाही?

मोदी ते तेंडुलकर, राज ते राज्यपाल, ‘शतकवीर’ बाबासाहेब पुरंदरेंच्या वाढदिवसाला दिग्गजांची उपस्थिती लावणार

भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा उजवे आहेत; भाजप आमदाराचा पलटवार

(ashish shelar slams shiv sena over bmc officer promotion issue)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.