अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1800 कोटींचे नुकसान, मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती

राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.

अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे 1800 कोटींचे नुकसान, मंत्री अशोक चव्हाण यांची माहिती
अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 8:02 PM

मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती आणि दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ही माहिती दिली.

अशोक चव्हाण म्हणाले, “राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले आहे. त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”

“नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून”

“अद्यापही अनेक ठिकाणी पाऊस सुरू असून दरडी साफ करण्याचे काम सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त रस्त्यांची छायाचित्रे व ड्रोन चित्रिकरणाच्या माध्यमातून प्राथमिक हानीचा अंदाज काढण्यात आला आहे,” अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

“290 रस्ते बंद, 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित, तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली”

“प्राथमिक अंदाजानुसार 290 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. 469 रस्त्यांवरील वाहतूक खंडित झाली होती, तर 140 पूल व मोऱ्या पाण्याखाली गेले होते. अंतिम पाहणी अहवालात नुकसानाच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या मंगळवारी 3 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाची मुंबईत बैठक होणार आहे. त्यावेळीही राज्यातील परिस्थितीचा पुनःश्च आढावा घेतला जाईल. दरम्यान, राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या नुकसानीबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली,” असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

मराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र

अतिवृष्टीमुळे नांदेडमध्ये मोठं नुकसान, तातडीने पंचनामे करा, आमदार जवळगावकर वडेट्टीवर-अशोक चव्हाणांच्या भेटीला

VIDEO: अशोक चव्हाण एकटेच दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी

व्हिडीओ पाहा :

Ashok Chavan inform about damage of roads in Maharashtra due to heavy rain flood

Non Stop LIVE Update
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट
मला ग्रेट भेटीच..., राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावर अमित ठाकरेंची पोस्ट.
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
संजय राऊत डोक्यावर पडलेले..., भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
मनसे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होणार का?संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया.
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड
मी लंगोट घालून तयार, मला भाजपला... वसंत मोरे यांनी थोपडले दंड.
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?
दानवेंची मनसे नेत्यानं काढली अक्कल, पद मिळालं म्हणून...,कुणाचा पलटवार?.
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
दानवे 8-10 दिवसांत आमच्यासोबत..., शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा.
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?
भाजप सोडल्यानंतर तुम्हाला कुत्रंही…कुणी केला खडसेंवर जोरदार पलटवार?.
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
स्मशानभूमीत जाण्यास डॉक्टरकडूनच अडकाठी, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही अजितदादांवर शिवतारेंची शाब्दिक फायरिंग.
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.