जादुई शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर : मुंबई उच्च न्यायालय

जादुई शक्ती असल्याचा दावा करत गोष्टी विकण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज (6 जानेवारी) दिला.

जादुई शक्ती असल्याचा दावा करणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर : मुंबई उच्च न्यायालय
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 07, 2021 | 1:39 AM

औरंगाबाद : जादुई शक्ती असल्याचा दावा करत गोष्टी विकण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिराती बेकायदेशीर असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज (6 जानेवारी) दिला. राजेंद्र अंभोरे विरुद्ध केंद्र सरकार असा हा खटला होता. विशेष म्हणजे अशा जादुई शक्तीचा दावा करणाऱ्या जाहिराती दाखवणारे टीव्ही चॅनल्सही काळा जादू कायद्यांतर्गत जबाबदार असणार आहे, असंही मत न्यायालयाने नोंदवलं आहे. यामुळे अशाप्रकारची जाहिरात करणाऱ्यांवर चांगलाच चाप बसणार आहे (Aurangabad Bench of Mumbai High Court on Advertisement with Magical claim to sale products).

औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारला अशाप्रकारच्या जाहिरातींवर दंडात्मक कारवाई करण्याचेही निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे आणि एम. जी. सेवलीकर यांच्या खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिलाय. याचिकाकर्ते राजेंद्र अंभोरे यांनी टीव्ही चॅनल्सवर हनुमान चालिसा यंत्र आणि त्यासारख्या गोष्टींची विक्री करण्यासाठी करण्यात येणाऱ्या जादुई दाव्यांविरोधात याचिका दाखल केली होती. तसेच अशा जाहिरातींवर बंदी घालण्याची मागणी केली होती.

उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी करताना म्हटलं, “कोणतंही यंत्र किंवा वस्तूची विक्री करण्यासाठी त्याला एखाद्या देवाचं, बाबाचं नाव जोडणं आणि त्यामध्ये काही जादुई शक्ती असल्याचा दावा करणं, या गोष्टी आनंदी करतील, व्यवसायात फायदा मिळवून देतील, करिअरमध्ये प्रगती होईल, शिक्षणात विकास होईल आणि आजारातून बरे होईल असा दावा करणं बेकायदेशीर असेल.”

अशाप्रकारचा आशय असलेल्या टेलिव्हिजनवरील जाहिराती देखील बेकायदेशीर आहेत. न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल देताना महाराष्ट्र जादुटोणाविरोधी कायद्यांच्या तरतुदींचा आधार घेत हा निकाल दिलाय. जादुटोणा करणं हा गुन्हा आहेच, पण अशा गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणे हा देखील गुन्हा असल्याचंही न्यायालयाने नमूद केलं. यासाठी न्यायालयाने जादुटोणा कायद्याच्या कलम 3(2) चा संदर्भ दिला. तसेच या गुन्ह्यात जाहिराती दाखवणाऱ्या टीव्ही चॅनल्सचीही जबाबदारी निश्चित केली जाईल, असं निरिक्षण नोंदवलं.

हेही वाचा :

Eknath Shinde| अंधश्रद्धेला बळी पडू नका, समाजाला सावध करा; अघोरी घटनांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मंतरलेले लिंबू आणि कुंकू दिल्याने 20 जणांना कोरोना, लातूरमधील धक्कादायक घटना

गावकऱ्यांची अंधश्रद्धा, गर्भवती सुनेचे पार्थिव झाडाला बांधण्याची कुटुंबाला जबरदस्ती

Aurangabad Bench of Mumbai High Court on Advertisement with Magical claim to sale products

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें