अविनाश जाधव यांना जामीन नाहीच, करारा जवाब मिलेगा, मनसेची पोस्टरबाजी

ठाणे दिवाणी न्यायालयाने मनसेचे नेते अविनाश जाधव त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे (Bail Application of MNS leader Avinash Jadhav).

अविनाश जाधव यांना जामीन नाहीच, करारा जवाब मिलेगा, मनसेची पोस्टरबाजी
Follow us
| Updated on: Aug 03, 2020 | 2:33 PM

ठाणे : सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप ठेवत तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेले मनसेचे नेते अविनाश जाधव यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, ठाणे दिवाणी न्यायालयात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला (Bail Application of MNS leader Avinash Jadhav). त्यामुळे त्याच्या वकिलाच्यावतीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात येणार आहे, अशी माहिती अविनाश जाधव यांचे वकील राजेंद्र शिरोडकर यांनी दिली. दुसरीकडे मनसेची ही लढाई चालूच राहणार असल्याचं मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

मनसे नेते अविनाश जाधव यांना आज पुन्हा एकदा ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कोर्ट परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. त्यामुळे पोलिसांनी देखील परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला. अविनाश जाधव यांना कापूरवाडी पोलीस स्टेशनमधून ठाणे कोर्टात हजर करण्यात आले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, ठाणे न्यायालयाने अविनाश जाधव यांना 2 दिवसांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज परत जाधव यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई आणि वकील राजेंद्र शिरोडकर कोर्टात हजर होते. ते म्हणाले, “सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत आहे की अविनाश जाधव यांनी शिवीगाळ केलेली नाही आणि सरकारी कामात अडथळाही आणलेला नाही. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय अविनाश जाधव यांना जामीन देईल.”

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

दुसरीकडे नितीन सरदेसाई यांनी हे राजकीय षडयंत्र असल्याचा अप्रत्यक्ष आरोप शिवसेनेवर केला आहे. मनसेकडून या प्रकरणावर जोरदार पोस्टरबाजी देखील केली आहे. यात सरकारला ‘करारा जवाब मिलेगा’ मिलेगा असं सांगण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. ठाण्याच्या खंडणीविरोधी विभागाने जाधव यांना ताब्यात घेतले. महापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्या प्रकरणी अविनाश जाधव हे आंदोलन करत होते.  वसई पालिका आयुक्त दालनात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

अविनाश जाधव यांना पुढील दोन वर्षांसाठी तडीपार होण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांतून तडीपार होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ :

संबंधित बातम्या : 

MNS Avinash Jadhav | मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस

अविनाश, आम्ही ठाण्याला येतोय, कोण अडवतंय बघूया, मनसेचा आक्रमक पवित्रा

Bail Application of MNS leader Avinash Jadhav

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.