AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळा परिसरात हे ड्रिंक विकाल तर व्हाल बर्बाद… राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर

State Government ban on Soft drink: गुटखा, पानमसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्री करता येत नाही. आता हे शीतपेय सुद्धा शाळाच्या जवळपास विक्री करता येणार नाही. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या ड्रिंकवर शाळा परिसरात बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

शाळा परिसरात हे ड्रिंक विकाल तर व्हाल बर्बाद... राज्य सरकारचा धडाकेबाज निर्णय, तुकाराम मुंढे येताच सरकार ॲक्शन मोडवर
शाळा परिसर, सॉफ्ट ड्रिंकImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jul 03, 2026 | 12:45 PM
Share

Ban on the sale of Sting drink within school premises: गुटखा, पानमसाला, सिगारेट या वस्तू शाळा परिसरात विक्रीस बंदी आहे. त्यात आता स्टिंग या शीतपेयाचा, सॉफ्ट ड्रिंकचाही समावेश झाला आहे. हे शीतपेय शाळेच्या परिसरात विक्री केल्यास धडक कारवाई होऊ शकते. अन्न आणि औषध प्रशासनाची सूत्र तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यानंतर राज्य सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी याविषयीचे निर्देश दिले आहेत.

स्टिंग पेय विक्रीला बंदी

राज्यात शाळा परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. आमदार विक्रम पाचपुते यांनी याविषयीचा प्रश्न उपस्थित केला होता. याविषयीची माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले. त्यांनी स्टिंग पेय विक्रीला बंदीचे निर्देश दिले आहे.

स्टिंगवर बंदी का?

स्टिंग या सॉफ्ट ड्रिंकवरून आमदार विक्रम पाचपुते यांनी प्रश्न उपस्थित केला. कॅफेन आणि शुगरच चे कॉन्बिनेशन आहे ते मुलांना अडिक्ट करण्यासारखं आहे. याच कॉम्बिनेशन धोकादायक आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित करत आहोत. याचे नमुने घेऊन चाचण्या करण्यात आल्या होत्या ते घातक आहे हे कंपनी स्वत: मान्य करत असल्याचा दावा आमदार पाचपुते यांनी केला आहे. पाचपुते यांनी याप्रकरणी सरकारला तीन प्रश्न विचारले होते.

१८ वर्षाखालील मुलाना स्टिंग विक्रीस मान्यता देण्यात येऊ नये यासाठी काही नियम करणार आहोत का ?

आयुक्तांना तसे अधिकार आहेत त्यांना सूचना देण्यात येणार का ?

दारूपेक्षाही घातक हे स्टिंग आहे.

विद्यार्थ्यांमध्ये जागृती

स्टिंग शाळेच्या आवारात विकल जाते हे काही अंशी खरं आहे. पण मागील ८ ते १० दिवसापासून शाळेतील शिक्षक आणि प्राचार्य यांना आम्ही मुलांना याबाबत माहिती देऊन त्याबद्दल सांगायला सांगितलं आहे, जेणेकरून विद्यार्थी ते खरेदी करणार नाहीत, अशी माहिती मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.

भास्कर जाधव यांचा आक्षेप

एफडीएच्या लॅब किती आहेत आणि त्या अपुऱ्या आहेत का आणि स्थिती काय आहे, अशी विचारणा आमदार राहुल कुल यांनी केली. मंत्री नरहरी झिरवळ यांनी यावर उत्तर देताना तुकाराम मुंढे यांचा उल्लेख मुंढे साहेब मुंढे साहेब असा उल्लेख करत होते, त्यावर भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. तुम्ही कॅबिनेट मंत्री आहात मुंढे साहेब काय म्हणता मुंढे म्हणा, असे ते म्हणाले.

Follow Us
13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
GTA 6 Launch : तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा संपली; GTA 6 लॉन्च होताच गेमिंग विश्वात धुमाकूळ
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या...
एकनाथ शिंदे निर्णय घेतील; शायना एनसी यांच्याबबात आणखी काय म्हणाल्या रितू तावडे?
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर...
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणीदरम्यान... अपात्रता प्रकरणात मला रिजॉइंडर करायचा आहे, सिब्बल नेमके काय म्हणाले?
मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं
Eknath Shinde : मोठी बातमी! पंढरपुरात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड; नेमकं काय घडलं?
गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल
Shivsena Hearing : गुवाहाटीमध्ये बसून व्हीप कोण असेल हे शिंदे ठरवू शकत नाहीत; कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला
Saif Ali Khan Threat : पहिल्यांदा चाकू लागला तेव्हा वाचलास, आता गोळी लागली तर…; सैफ अली खानला धमकीचा मेसेज
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत