‘भारत बंद’च्या दिवशीही मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य; बेस्ट आणि टॅक्सी नेहमीप्रमाणे धावणार

बेस्ट प्रशासनाने यापूर्वीच आम्ही 'भारत बंद' आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. | Bharat Bandh andolan

'भारत बंद'च्या दिवशीही मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य; बेस्ट आणि टॅक्सी नेहमीप्रमाणे धावणार
Follow us
| Updated on: Dec 08, 2020 | 8:20 AM

मुंबई: दिल्लीत सुरु असणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला (Bharat Bandh) मुंबईत सकाळच्या सत्रात फारस प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कारण, मुंबईच्या रस्त्यांवर आज सकाळपासूनच वाहनांची वर्दळ नेहमीप्रमाणे दिसत आहे. बेस्ट बसेस, टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यांवर नेहमीप्रमाणे धावत आहेत. (Transport service in Mumbai on Bharat Bandh day)

बेस्ट प्रशासनाने यापूर्वीच आम्ही ‘भारत बंद’ आंदोलनात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आज बेस्टच्या बसेल लोखंडी जाळ्या लावून रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील टॅक्सी संघटनेकडूनही मंगळवारी आपली सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरील वर्दळ सामान्य राहण्याची शक्यता आहे.

नवी मुंबईत पाचही बाजार समित्या बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये एपीएमसी मार्केट सहभागी झाले असून, नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात आज कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. एपीएमसी मधीलपाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या असून नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकाऱ्यांसोबत माथाडी कामगारांचा देखील रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

पुण्यातही कडकडीत बंद

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक झाली आहे. एरवी दररोज किमान 900 मालवाहतूक गाड्यांमधून या बाजार समितीत फळं आणि भाजीपाल्याची आवक होत असते. त्यामुळे बाजार समितीत आज गर्दी दिसून येत नाहीये. बाजार समितीतील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ शेतकरी बंदच्या समर्थनार्थ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला. हमालही सहभागी झाले असल्याने मार्केटमध्ये शांतता दिसत आहे.

आंदोलनात किती संघटनाचा सहभाग?

शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिल्याने कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे. या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पक्ष, टीआरएस, आरजेडी, टीएमसी, डीएमके, सपा, जेएमएम आणि आयएनएलडी हे पक्ष सहभागी झाले आहेत.

संबंधित बातम्या:

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय

FARMER PROTEST | कृषी कायद्यावर विरोधी पक्षांची भूमिका दुतोंडी ? केंद्रीय कायदा मंत्र्यांचा हल्लाबोल

क्रीडापटूंची शेतकऱ्यांना साथ, राष्ट्रपती भवनात पुरस्कार वापसीसाठी जाणाऱ्या खेळाडूंची पोलिसांकडून अडवणूक

(Transport service in Mumbai on Bharat Bandh day)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.