Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 10 जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली आहे. (Bhandup Sunrise Hospital Fire)

Bhandup Hospital Fire | भांडूपच्या मॉलमधील रुग्णालयातील भीषण 11 तासांनी आटोक्यात, 10 जणांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश
Bhandup Sunrise Hospital Fire
Follow us
| Updated on: Apr 27, 2021 | 5:27 PM

मुंबई : भांडूपच्या ड्रीम मॉलमधील सनराईस रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग तब्बल 11 तासांनी आटोक्यात आली आहे. या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली आहे. मात्र ही आग नेमकी कशी लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Bhandup Dream mall Sunrise covid Hospital Fire)

11 तासांनी आग आटोक्यात

भांडूप पश्चिमेकडे प्रसिद्ध ड्रीम मॉलला रात्री 12 च्या सुमारास भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईस रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. सुरुवातीला ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावर लागली होती. त्यानंतर या आगीने रौद्ररुप धारण केल्याने ती मॉलमधील रुग्णालयात पसरली. या रुग्णालयात 76 रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

भांडूपमधील अग्नितांडवात 61 जणांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले होते. तर चार जणांचा शोध सुरु आहे. या मॉलच्या चारही बाजूला आग पसरल्याने अग्निशमन दलाला रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडचणींचा सामना करावा लागत होता. तब्बल 11 तासांनी ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची पाहणी केली. ही पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना जर यात दिरंगाई, दुर्लक्ष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, अशी सूचना दिली आहे.

“या दुर्घटनेतील जखमींवर तात्काळ उपचारासाठी परवानगी दिलेली आहे, त्यातील हे मॉलमधलं हॉस्पिटल आहे. राज्यभर जिथे शक्य तिथे कोव्हिड हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. या हॉस्पिटलला तात्पुरती परवानगी होती, येत्या १ तारखेला संपत होती. दुर्दैवाने हॉस्पिटलच्या खाली असलेल्या दुकान, तळमजल्यांना आग लागली. ती हॉ,स्पिटलपर्यंत आली. जे कोरोना रुग्ण अॅडमिट होते, त्यातील बाहेर काढताना काहींचा मृत्यू झाला. अशा घटना झाल्यानंतर आपण जागे होतो, चौकशी होते.. या प्रकरणातही चौकशी करुन कारवाई करु… अशा घटना होऊ नयेत, म्हणून .. कमला मिलमध्येही आग लागली होती, अशा दुर्घटना होऊ नयेत, कोव्हिड सेंटर, जम्बो फॅसिलिटी सेंटरमधील स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिटच्या सूचना दिल्या आहेत.. दुर्घटना टळल्या पाहिजे

कोरोनाच्या संसर्गामुळे आपण मॉल, सेंटर्समधील वर्दळीवर बंधनं आणली आहेत..मात्र ही दुर्घटना घडली आहे, ज्यांचं कौटुंबीक नुकसान झालं आहे, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जर यात दिरघांई, दुर्लक्ष असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल.,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बीएमसीचं दुर्लक्ष आणि ढिसाळपणा स्पष्ट दिसतो : देवेंद्र फडणवीस

झालेली घटना अत्यंत गंभीर, हे कोव्हिड रुग्णालय याठिकाणी सुरु झालं, या मॉलला ओसी नव्हती, मुख्यमंत्री म्हणाले, आवश्यकता असल्याने सुरु केलं. यातील महत्त्वाचा विषय असा आहे, भंडाऱ्याची घटना झाल्यानंतर सर्व रुग्णालयांची फायर ऑडिट करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. जी तात्पुरती रुग्णालये आहेत ,त्यांचं ऑडिट करणं आवश्यक होतं, ते झालं नाही..

सरकार केवळ घोषणा करतं. रेस्क्यूसाठी जागा नव्हती. संभ्रमाच्या गोष्टी आहेत, आग नेमकी कुठे लागली, कशी लागली, पीएमसी बँकेशी संबंध आहे, काही दुकानदार सांगतात, आमची केस होती म्हणून आग लागली.. ठिक आहे, या सर्व कथांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही, विश्लेषण करावं लागेल, जी घटना घडली आहे, त्यामध्ये बीएमसीचं दुर्लक्ष आणि ढिसाळपणा स्पष्ट दिसतोय. आता त्यावर बोलणं चालणार नाही, दुखात आहेत, पण अजून कितीची मृत्यूची वाट पाहताय… उद्या अशी घटना इतर सेंटर्समध्ये झाली तर कोण जबाबदार, अशा घटना होऊ नयेत यासाठी खबरदारी होणं आवश्यक आहे… चौकशी होऊन दोषींवर कारवाई करावी. फायर सेफ्टी ऑडिट झालं नसेल तर जबाबदार लोकांवर कारवाई करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबईच्या महापौर घटनास्थळी

भांडूपमधील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाच्या 20 गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी हे देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. (Bhandup Dream mall Sunrise covid Hospital Fire)

रात्री 12 च्या सुमारास मॉलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. या आगीचा धूर सनराईस रुग्णालयात पसरला. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची धावपळ उडाली. यानंतर अग्निशमन दलाने उपचार घेत असलेल्या काही रुग्णांना दोन शिड्यांच्या मदतीने बाहेर काढले. याच दरम्यान ही आग प्रचंड वाढली. त्यामुळे या आगीत अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात होती.

महापौरांकडून चौकशीचे आदेश

अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु असताना महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी हे बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहे. मात्र ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय नेमकं कसे गेलं, याबद्दल महापौर किशोरी पेडणेकरांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच याप्रकरणाची चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली. (Bhandup Dream mall Sunrise covid Hospital Fire)

संबंधित बातम्या : 

Goregaon, Rabale Fire | गोरेगावात भीषण अग्नितांडव, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, तर रबाळेतही कंपनीला आग

VIDEO | जप्त केलेल्या गाड्यांना भीषण आग, वाळीव पोलीस ठाण्यासमोर आगीचे तांडव

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.