AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena : सर्वात मोठी बातमी ! शिवसेनेच्या फुटीमागे वहिणींचा हात, थेट नाव घेत गोगावलेंनी टाकला बॉम्ब; राजकीय वर्तुळात खळबळ

Bharat Gogawale Big Allegation : शिवसेनेत सर्वात मोठी उभी फूट पडून मोठा कालावधी उलटला आहे. पण या फुटीमागील सल काही गेल्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्या नाजूक जखमेवरील खपली निघते आणि रक्त भळभळते. वेदना आपसूक बाहेर पडतात.

Shivsena : सर्वात मोठी बातमी ! शिवसेनेच्या फुटीमागे वहिणींचा हात, थेट नाव घेत गोगावलेंनी टाकला बॉम्ब; राजकीय वर्तुळात खळबळ
शिवसेनेत उभी फुट कुणामुळे?Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 15, 2025 | 1:49 PM
Share

Rashmi Thackeray : शिवसेनेते उभ्या फुटीनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार गडगडले. राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेत उभी फूट हा आजही ताजा इतिहास म्हणावा लागेल. या फुटीचे कितीही रवंथ केले तरी ते संपत नाही. या फुटीमागील सल काही गेल्या शिवसैनिकांच्या मनातून जात नाही. त्या नाजूक जखमेवरील खपली निघते आणि रक्त भळभळते. वेदना आपसूक बाहेर पडतात. आता शिंदेसेनेचे कोकणातील शिलेदार भरतशेठ गोगावले यांनी या फुटीच्या कारणाची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. यावेळी त्यांनी आतापर्यंत कधीही न पुढे आलेला एक दावा केला आहे. या फुटीमागे वहिनींचे हात असल्याचा बॉम्बगोळा गोगावले यांनी टाकला.

रश्मी ठाकरे यांच्यामुळे फूट

आम्ही शिवसेनमधून बाहेर पडायला अनेक कारण आहेत. पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीच खूप ऐकतात. त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांना दिला पाहिजे होते आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायला नको होते. पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती. पण उद्धव ठाकरे बाईच ऐकत होते. रश्मी ठाकरे यांचे नाव न घेता भरत गोगावले यांनी फुटीमागील अनेक कारणांपैकी रश्मी ठाकरे पण एक कारण असल्याचे म्हटले आहे. आमदार कार्यकर्त्यासह त्यांना भेटायला जात तेव्हा त्यांना बसवून ठेवले जायचे. त्यांना उद्धव ठाकरे भेटत नसत. त्यामुळे आमदाराचे काम होत नसेल तर कार्यकर्त्याचे कोण ऐकतो असा तक्रारीचा सूर उमटत होता. पण ती तक्रार कोणी दूर केली नाही असा आरोप त्यांनी केला. बाळासाहेबाप्रमाणे उद्धव ठाकरे नव्हते असे ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या कामाची पध्दत आम्हाला उध्दवसाहेबांमध्ये दिसली नाही. माझ्या वाढदिवसाला बाळासाहेबांना भेटायला गेलो तेंव्हा बाळासाहेब बोलले खाली बसायचं नाही. तुला खुर्ची मी देणार आहे आणि काढून घेणाराही मी आहे. बाळासाहेब गेल्यानंतरचा कारभार आम्हाला आवडला नाही.

महिलांचा कुठपर्यंत हस्तक्षेप घ्यायला पाहिजे विचार करायला पाहिजे. पडद्याच्या पाठिमागून वहिनींचा हस्तक्षेप बराचसा होता. उध्दवसाहेबांच्या मनात अनेक गोष्टी असाच्या मात्र नंतर बदल व्हायचा. आम्ही मातोश्रीवरून परत आल्यानंतर कार्यकर्त्यांना कसं वाटणार आमदारांना एंट्री नाही. आता ज्या एंट्री आहेत ती रहायला पाहिजे. संघटनेसाठी काम करणाऱ्या माणसाला फाट्यावर माराल तर अशीच स्थिती होणार, असे अनुभव सांगत गोगावले यांनी मन मोकळे केले.

आम्ही आत्ता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे जात आहोत आणि कायम त्यांच्या सोबत आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा आम्ही जपत आहोत. त्यामुळे पक्षाचं नाव आणि पक्षच चिन्ह आम्हाला मिळाला आहे दोन्ही ठाकरे एकत्र येणार होते पण उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा चान्स पण गमावला, असा टोला गोगावले यांनी लगावला.

किशोरी पेडणेकरांकडून प्रत्युत्तर

भरत गोगावले यांच्या आरोपांना मुंबई महापालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिले आहे. टू द पॉईंटला आता यांना साक्षात्कार होत असतील तर मला वाटतं आता यांचा पॉइंटच चुकला आहे. जे पॉईंट छेदण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणजे अधोगतीला पोहचण्याची लक्षण त्यांची दिसत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

ज्या पद्धत्तीने पती- पत्नी, माँ माँ ज्या पद्धत्तीने घरात वागत होत्या, टिळा लावत होत्या त्याप्रमाणेच वहिनी भूमिका बजावत आहेत. रश्मी वहिनी ठाकरे घराण्याची परंपरा, संस्कार आहेत तेच रश्मी वहिनी करत आहेत. जेव्हा साहेब ओरडले तर हीच लोक वहिनींना मध्यस्थी करायचे. आज तुम्ही ती मध्यस्थी राजकारणातला टू द पॉईंट म्हणून जर काढत असतील, तर याला म्हणतात बुद्धीची कीव करावी, बुध्दीची अधोगती बघावी, असा घणाघात त्यांनी घातला.

आदित्यने मंत्री होऊ नये असे का वाटते. वयाच्या 14 व्या वर्षांपासून सिनेट च्या निवडणुका, पक्ष वाढवण्यासाठी घेतलेली मेहनत, त्यांच्यातील झलक बघून, हीच लोक त्यांना मंत्री करायचे म्हणत होते. आता निष्ठावान मधला बडगा कसा असतो, किंवा बडग्यातील निष्ठावंत कसा असतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, असा जिव्हारी लागणारा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला.

राज -उद्धव एकत्रिकरणावर भाष्य

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात जी भेट झाली, ती एकदम कोणत्या टोकाला नेऊन चालणार नाही, त्यांच्या पक्षातील काही काम असू शकतात, किंवा राज्यात, देशात काय चाललंय याविषयी सुद्धा एक भेट घेऊन बोलले असावेत. जोपर्यंत त्यांच्याकडून अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणे योग्य नाही, असे पेडणेकर म्हणाल्या.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी