वांद्र्याच्या MTNL इमारतीला भीषण आग

वांद्र्यातील एमटीएनल इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे एकच खळबळ परिसरात उडाली आहे. ही घटना आज (22 जुलै) दुपारी 3 च्या दरम्यान घडली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

वांद्र्याच्या MTNL इमारतीला भीषण आग
Follow us
| Updated on: Jul 22, 2019 | 9:02 PM

मुंबई : वांद्र्यातील MTNL इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही आग आज दुपारी 3 च्या दरम्यान लागली. एसीमुळे MTNL इमारतीमध्ये आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत इमारतीमधील 84 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. .

दुपारी तीनच्या सुमारास ही आग लागली. आग लागली त्यावेळी अनेक कर्मचारी कार्यालयात होते. आगीमुळे धुराचे लोट पसरुन इमारतीचा तिसरा आणि चौथा मजला वेढला. आग भडकत जाऊन ती तिसऱ्या मजल्यावरुन चौथ्या आणि पाचव्या मजल्यापर्यंत पोहोचली. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी थेट टेरेसकडे धाव घेतली.

आग लागल्यामुळे अनेकजण जीव वाचवण्यासाठी टेरेसवर गेले होते. या आगीत 100 पेक्षा अधिक कर्माचारी अडकल्याचे बोललं जात होतं. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

आग लागलेल्या परिसरात वारेही मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने आग भडकत आहे. जवळपास 40 कर्मचारी टेरेसवर जाऊन मदतीची वाट पाहात होते. टेरेसवरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बाजूच्या इमारतीमध्ये शिड्या लावून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

आगीमुळे इमारतीची लिफ्ट बंद करण्यात आली आहे. अग्निशमन दल कसोशीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. निर्मल नगर पोलीस, वांद्रे पोलीस, खेरवाड़ी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

या आगीमुळे वांद्रे स्टेशन परिसरात धुराचे लोळ पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या आगीचा फटका वांद्र्ये परिसरातील अंजुमन इस्लाम शाळेलाही बसला आहे. आगीमुळे धुराचे लोळ शाळेत पसरले आहेत. यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने शाळाही लवकर सोडण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.