AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि मनसेला सर्वात मोठा झटका, नेमकं काय घडलं?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाने पनवेलमध्ये भाजप आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे. पनवेलमधील भाजप आणि मनसेच्या काही दिग्गज पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांना आगामी निवडणुकीत याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि मनसेला सर्वात मोठा झटका, नेमकं काय घडलं?
उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 15, 2024 | 6:46 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला मोठा झटका दिला आहे. कारण पनवेलमध्ये भाजपच्या 4 माजी नगरसेवकांनी आणि मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी सिडकोकडून वसूल केल्या जाणाऱ्या मालमत्ता करावर भूमिका मांडली. “निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने मावळे येत आहेत. संख्या वाढत आहे. या सर्वांचं स्वागत आहे. ही टीम आली. ती पनवेलमधील आहे. संजोग वाघेरे यांच्या मावळ मतदारसंघातील आहे. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर करतात. अशक्यप्राय गोष्टी आम्ही करू सांगत असतात. ते सांगतात मूळचे प्रश्न दूर राहतात. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या नाहीत. तिथले जे काही प्रश्न आहेत. त्यावर आंदोलन झाले आहेत. अजूनही सुरू आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“मालमत्ता कर हा प्रश्न आहे. मालमत्ता कर भरू नये असं नाही. पण डबल वसुली होत आहे. सिडकोकडून वसुली केली जात आहे. महापालिकेकडून कोणतीही सेवा न देता कर आकारली जात आहे. ही जुलूमशाही आहे. दोन लाख 80 हजार जनतेने त्याचा निषेध करत डबल कर भरण्यास नकार दिला आहे. कर जुलमी पद्धतीने वसूल केला जात आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘विषमतेविरोधात आवाज उठवला पाहिजे’

“पलवा सिटीला मात्र करमुक्ती केली आहे. ही विषमता आहे. त्याविरोधात आवाज उठवला जात आहे. मुंबई महापालिकेची २०१७ची निवडणूक लढवताना ५०० स्क्वेअरफूटापर्यंतच्या मालमत्ता कर रद्द करू, असं सांगितलं होतं ते केलं. राज्यात आणि केंद्रात आमचं सरकार आल्यावर आम्ही पनवेलमधील कर रद्द करू. कारण नसताना डबल कर भरण्यास आमचा विरोध आहे. वसुली सरकारचा हा विचित्र प्रकार आम्ही थांबवू”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद’

“पनवेलमधून आम्हाला नवीन ताकद मिळाली आहे. आता पनवेलमध्ये आम्ही चार पावलं पुढे जाऊ”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच “२०१४ आणि २०१९लाही भाजपने जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. ते जाहीरनामे प्रसिद्ध करत राहतील. पण आता ते सत्तेत येणार नाही. त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow Us
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत