AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना विनोद तावडे, ना नारायण राणे, ना पंकजा मुंडे, भाजपकडून ‘या’ नेत्यांना राज्यसभेची मोठी संधी

भाजपकडून आज अखेर राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपकडून राज्यसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भाडपकडून निष्ठावंत नेत्यांचा यावेळी विचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

ना विनोद तावडे, ना नारायण राणे, ना पंकजा मुंडे, भाजपकडून 'या' नेत्यांना राज्यसभेची मोठी संधी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 14, 2024 | 3:05 PM
Share

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. मेधा कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून नाराज होत्या. त्यांचं गेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यामुळे त्या नाराज होत्या. भाजपने अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपचे जुने कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. अखेर त्यांना पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीचं बक्षीस मिळालं आहे.

भाजपकडून अधिकृतपणे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संधी दिली जाणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. कदाचित त्यांना लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात भाजप उतरवण्याच्या तयारीत असण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप नेते विनोद तावडे यांच्यादेखील नावाची चर्चा होती. पण त्यांनाही संधी देण्यात आलेली नाही. तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनाही राज्यसभा निवडणुकीत संधी देण्यात आलेली नाही.

कोण आहेत अजित गोपछडे?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची संधी मिळाली आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळालं आहे.

मेधा कुलकर्णी यांची मनधरणी करण्याचा यशस्वी प्रयत्न

मेधा कुलकर्णी या पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. आपलं तिकीट कापण्यात आल्यामुळे मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. पुण्यात बरेच दिवस हे नाराजी नाट्य दिसलं. त्यानंतर अखेर त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं