लाडकी बहीण योजनेचे खरे श्रेय कोणाला… देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाव घेऊन सांगितली…
Devendra Fadnavis: लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व आहे. मोठा भाऊ कोण आहे,याचे बहिणांना काय घेणे देणे नाही. त्यांना सर्व भाऊ सारखेच आहे. या योजनेवरुन मंत्रिमंडळात वादा झाला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात सर्वाधिक चर्चा सध्या लाडकी बहीण योजनेची आहे. या योजनेची धास्ती विरोधकांनीही घेतली आहे. तसेच दुसरीकडे या योजनेवरुन महायुतीमध्ये श्रेयवाद सुरु करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांत या योजनेचे श्रेय घेण्याचे वाद सुरु आहे. नेमका याच प्रश्नावर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिले. लाडकी बहीण योजनेचे श्रेय त्यांनी एका गटाला देऊन टाकले. ‘टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्ह’मध्ये महाराष्ट्राचा महासंकल्पात देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी लाडक्या बहिणीचे श्रेय तिन्ही पक्षांना म्हणजे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीला नाहीतर चौथ्याच गटाला दिले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणीचे श्रेय कोणाला? या प्रश्नावर बोलतना देवेंद्र फडणवीस की, लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. ती मुख्यमंत्र्यांच्या नावानेच आहे. ही खरी योजना मध्य प्रदेशातील आहे. त्यासंदर्भात शिवाराजसिंह चौहान यांनी आम्हाला कल्पना दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बैठकीत सांगितले की, ही योजना आपण राबवू या. त्यांना आम्ही सर्वांनी मान्यता दिली. कोणत्याही सरकारच्या निर्णयाचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. कारण मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी किंवा सर्व मंत्री काम करतो. यामुळे सरकारच्या सर्व निर्णयांचे आणि योजनेचे श्रेय मुख्यमंत्र्यांना असते. लाडकी बहीण योजनेचे श्रेय म्हणावे तर ते तिन्ही पक्षांना नाही. आमच्या लाडक्या बहिणींना आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बारामतीमध्ये पोस्टर, भाजपची ब्रँडींग
बारामतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे लाडकी बहीण योजनासंदर्भात पोस्टल लागले. देवा भाऊ असे हे पोस्टर आहेत. देवा भाऊ या नावाने मला यापूर्वी ओळखले जात होते. या योजनेचे श्रेय घेण्यात दादांनी आघाडी घेतली आहे? त्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे. मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व आहे. मोठा भाऊ कोण आहे,याचे बहिणांना काय घेणे देणे नाही. त्यांना सर्व भाऊ सारखेच आहे.
सरकारची सर्व भिस्त फक्त लाडक्या बहिणींवर आहे का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारच्या वेगवेगळ्या योजना सुरु आहे. परंतु फोकस आहे. कारण ५० टक्के लोकांना या योजनाचा लाभ आहे. सर्व प्रशासन लाडक्या बहिणींसाठी काम करत आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु या योजनेवर फोकस अधिक आहे. या योजनेवरुन मंत्रिमंडळात वादा झाला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.