AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya Bail | किरीट सोमय्यांना अंतरिम दिलासा, ‘विक्रांत बचाव’ फंड फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामीन

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाकडून सोमय्यांना अटी-शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. विक्रांत बचाव मोहिमेत घोटाळा केल्याच्या आरोपाखाली सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Kirit Somaiya Bail | किरीट सोमय्यांना अंतरिम दिलासा, ‘विक्रांत बचाव’ फंड फसवणूक प्रकरणात अटकपूर्व जामीन
kirit somaiyaImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 1:30 PM
Share

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांना हायकोर्टाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुंबई (Bombay High Court) बुधवारी सोमय्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे, मात्र काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी सोमय्यांवर केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या आऊट ऑफ रीच आहेत. अटक झाल्यास किरीट सोमय्या यांना 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सोडण्यात येईल. तर 18 एप्रिलपासून चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पोलिस ठाण्यात हजेरी लावावी लागेल, या शर्ती ठेवण्यात आल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

याआधी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमय्या यांच्या घरावर धडक देत त्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. यापूर्वीही सोमय्या पिता-पुत्रांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते, मात्र ते दोघेही हजर झाले नव्हते. दुसऱ्या नोटिसीनंतरही ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत, तर त्यांना फरार घोषित केले जाईल, असं पोलिसांनी सांगितलं होतं. मंगळवारीच पुत्र नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे धक्का बसलेल्या किरीट सोमय्यांना तूर्तास उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

लाईव्ह लॉचे ट्वीट

‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा फंड जमा करुन घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून सोमय्या परागंदा झाले आहेत. आर्थिक  गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सोमय्या यांच्या घरी जाऊन राहत्या घराच्या दरवाजावर नोटीस चिटकवली होती. या नोटीशीमध्ये आज सकाळी अकरापर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

चौकशीसाठी हजर व्हा, अन्यथा फरार घोषित करू, सोमय्यांना आर्थिक गुन्हेशाखेची नोटीस

गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.