बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले 53.72 कोटी कुणाचे?; किरीट सोमय्यांचा सवाल

बुलढाणा सहकारी पतसंस्थेत एकूण 53.72 कोटी रुपये सापडले आहेत. हे पैसे नक्की कुणाचे आहेत? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. (bjp leader kirit somaiya reaction on buldhana co operative bank)

बुलढाणा सहकारी पतसंस्थेत सापडलेले 53.72 कोटी कुणाचे?;  किरीट सोमय्यांचा सवाल
kirit somaiya

मुंबई: बुलढाणा सहकारी पतसंस्थेत एकूण 53.72 कोटी रुपये सापडले आहेत. हे पैसे नक्की कुणाचे आहेत? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच हे पैसे नक्की कुणाचे आहेत याची माहिती घेण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्यांचही सोमय्या यांनी स्पष्ट केलं.

सप्टेंबर महिन्यात बुलढाणा येथील बुलढाणा सहकारी पतसंस्थेत आयकर विभागाच्या धाडी पडल्या. कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार, काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग आयकर विभागाला सापडले होते. आता पर्यंत 1200 हून अधिक खाती बेनामी असल्याचे सिद्ध होत आहे, या खात्यांद्वारा 53.72 कोटी मनी लॉंडरींग करण्यात आल्याचं उघड झालं आहे. आयकर विभागाने हे 53.72 कोटी रुपये असलेली 1200 बँक खाती स्थगित केले आहेत आणि पैसे जप्त केले आहेत, असं सोमय्या यांनी सांगितलं.

हे पैसे कुणाचे?

भाजपा नेते किरीट सोमैया यांनी हे पैसे ठाकरे सरकारच्या एका मंत्र्याचे असल्याचे कळते असा दावा केला आहे. बुलढाणा सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षांना या व्यवहारांची पूर्ण जाणीव आहे. बुलढाणा नागरी पतसंस्था द्वारा कोट्यवधी रुपयांचे बेनामी व्यवहार होत आहेत, याची माहिती गेले अनेक महिने कानी आली होती. ठाकरे सरकारचे राजकीय नेते मंत्री आणि या पतसंस्था/ बँकेचे अध्यक्ष द्वारे अश्या प्रकाराचे शेकडो बेनामी बँक खाते उघडणे, त्यात रोख रक्कम जमा करणे, व त्या समोर कोट्यवधींचे रुपयांचे कर्ज देण्याचे व्यवहार ही पुढे येत आहेत, असं सोमय्या म्हणाले.

दिल्लीतून माहिती घेणार

या पतसंस्थेकडून आघाडी सरकारच्या मंत्र्यांना 70 कोटींचं कर्ज देखील अपारदर्शक पध्दतीने देण्यात आल्याचेही कळते. या पतसंस्थेच्या नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद शाखेत मोठ्या प्रमाणात मनी लाँडरींग झाले आहे असे समजते. उद्या या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्ली येथे जात आहेत. दिल्लीत सहकार मंत्रालय, ED, आयकर विभाग अशा विभिन्न अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन माहिती घेणार आहे, असं सोमय्या यांनी सांगितलं. शुक्रवारी या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी किरीट सोमय्या बुलढाणा येथे सुद्धा भेट देणार आहेत. आणि त्यानंतर ते नांदेडलाही जाणार आहेत.

 

संबंधित बातम्या:

अस्लम शेख यांचे काशिफ खानशी संबंध काय? मलिक यांचे आरोप गंभीर, कॉल रेकॉर्ड चेक करा; मोहित कंबोज यांची मागणी

सॅमचं खरं नाव काय?, डिसूझा आणि एनसीबी अधिकाऱ्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप जारी; मलिक यांचा नवा धमाका

गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर निलेश राणेंचं वादग्रस्त ट्विट, जळगावात शिवसैनिक आक्रमक
(bjp leader kirit somaiya reaction on buldhana co operative bank)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI