उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची पक्षातून हकालपट्टी करावी, यांनी केली मागणी पण कारण काय..?
खासदार संजय राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाची तुलना काल नॅनो मोर्चाबरोबर केली आहे. हे वाईट कृत्य त्यांनी केल्यामुळे त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे.

मुंबईः महाविकास आघाडीच्या महामोर्चावर आता सत्ताधारी पक्षाकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्याकडून ही टीका केली जात असतानाच आता संजय राऊत यांनाही लक्ष्य केले जात आहे. महामोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी नॅनो मोर्चा म्हणून टीका केल्यानंतर खासदार संजय राऊत यांना आता लक्ष्य केले जात आहे. संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना भाजपच्या प्रसाद लाड यांनी म्हटले आहे की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी सातत्याने मराठी समाज, मराठा मोर्चा असेल किंवा मराठा आंदोलन असेल मराठा आरक्षण असेल यांच्यार सातत्याने टीका केली गेली आहे.
खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीने जो मोर्चा काढला होता तो नॅनो मोर्चाच होता.
तो मोर्चा महामोर्चा होऊ शकला नाही म्हणून मोठा मोर्चा होता हे दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे त्यांनी मराठा क्रांती मोर्चातील व्हिडीओ शेअर केले आहेत अशीही टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचा महोमोर्चा मुंबई निघाला असला तरी तो नॅनो मोर्चा होता.
त्याचमुळे खासदार संजय राऊत यांनी मराठा क्रांती मोर्चाची तुलना काल नॅनो मोर्चाबरोबर केली आहे. हे वाईट कृत्य त्यांनी केल्यामुळे त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे.
मराठ क्रांती मोर्चाला मराठा आरक्षण आणि मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. मात्र संजय राऊत यांनी हा मोर्चा आपलाच आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संजय राऊत तुम्ही मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही प्रसाद लाड यांनी केली आहे.
