मुंबई महापालिका शाळांच्या इंग्रजी नामकरणाला भाजपाचा विरोध

शाळेचे नाव इंग्रजी करून शैक्षणिक दर्जोन्नती होणार आहे काय? | BMC schools in Mumbai

मुंबई महापालिका शाळांच्या इंग्रजी नामकरणाला भाजपाचा विरोध
Follow us
| Updated on: Feb 25, 2021 | 4:19 PM

मुंबई: महापालिकेच्या शाळांचे (BMC Schools) मुंबई पब्लिक स्कूल असे नामांतर करून नवीन लोगोसह M.P.S. असे संबोधले जाईल, असे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केले आहे. मातृभाषेतील मराठी शाळांची नावे इंग्रजीत रूपांतर करण्याच्या आयुक्तांच्या या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध केला. (BJP oppose giving english name to BMC schools in Mumbai)

स्थायी समितीत अर्थसंकल्पीय भाषणात नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी असे प्रतिपादन केले की, “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासक्रमात मातृभाषेला प्राधान्य देते. याउलट महापालिका आयुक्तांनी शाळांना मुंबई पब्लिक स्कूल असे संबोधण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त महोदय, प्राथमिक शाळेपासुनच बालमनावर मराठीच्या गळचेपीचे कुसंस्कार करू नका. आपण मातृभाषेतल्या शाळेच्या नावाला मात्र इंग्रजीमध्ये रुपांतरीत करीत आहात! केवढा विरोधाभास ?” Mr. Commissioner This is neighther British India, nor Old India …This Is Modiji’s New India … implementing New Education Policy. त्यामुळे ही असली थेरं, आम्ही चालू देणार नाही, असे भालचंद्र शिरसाट यांनी सांगितले.

‘हेच काय मराठी भाषेचं संवर्धन?’

मी, स्वत: कर्मवीर दादासाहेब गायकवाड नगर महापालिका प्राथमिक शाळा, सरदार नगर, शीव – कोळीवाडा या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. आता इंग्रजी नामकरणानंतर या शाळेचं बारसं होणार आहे असे आयुक्तांनी नमूद केले आहे. मुंबई पब्लिक स्कूल ? हेच काय मराठी भाषेचं संवर्धन ? हेच काय मराठी भाषेचे जतन? आम्ही मायमराठीची अवहेलना आणि उपेक्षा सहन करणार नाही. नाईटलाईफ नेतृत्वाचाच संकल्प असल्याने याबाबत महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मूग गिळून गप्प आहे. मराठीबहुल भागातील अनेक शाळा बंद पडत आहेत. सत्ताधाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना केवळ इंग्रजी नामांतरात रस आहे.

मागील पन्नास वर्ष शिवसेना मुंबईत मराठी अस्मितेचा मुद्दा घेऊन राजकारण करत आहे, तर याच शिवसेनेची मागील २५ वर्ष मुंबईत सत्ता आहे. मात्र, राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील मराठीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. गेली अनेक वर्ष महापालिकेमध्ये मराठी भाषा विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ढिम्म प्रशासन आणि मराठीबाबत उदासीन सत्ताधारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.

शाळेचे नाव इंग्रजी करून शैक्षणिक दर्जोन्नती होणार आहे काय?” मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला माय मराठीला डावलून इंग्रजीच्या उदात्तीकरणाचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष हाणून पाडेल असा इशारा भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या:

महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांना देण्याचा डाव सुभाष देसाईंनी हाणून पाडला

राज ठाकरेंना शिवसेनेचा धक्का; मुंबई महापालिकेने ‘तो’ प्रस्ताव नाकारला

(BJP oppose giving english name to BMC schools in Mumbai)

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.