AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रशासन व सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतरही नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणीही फिरकलेसुद्धा नाहीत; साधी दखलही घेतली नाही.

प्रशासन व सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा
प्रशासन व सत्ताधारी यांच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समिती सदस्यांचा राजीनामा
| Edited By: | Updated on: Dec 02, 2021 | 6:04 PM
Share

मुंबई : नायर रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वरळी मतदार संघामधील बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ भाजपा सार्वजनिक आरोग्य समितीच्या सर्व सदस्यांनी राजीनामा दिला. महापौरांना पत्र देऊन राजीनामा दिला.

पीडित कुटुंबीयांना 25 लाख द्या

गुरुवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आ. योगेश सागर, आ. अमित साटम, गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेऊन झालेल्या दुर्दैवी प्रकाराची सविस्तर माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णसेवेत अक्षम्य हेळसांड, दुर्लक्ष व गोल्डन आवरमध्ये विलंब झाल्याचे मान्य केले. यावेळी भाजपा शिष्टमंडळाने मृत बालकाच्या नातेवाईकांना रुपये पंचवीस लाख नुकसान भरपाई द्यावी आणि सदर घटनेची चौकशी महापालिकेबाहेरील तज्ज्ञ डॉक्टरांच्या त्रयस्थ समितीद्वारे करण्यात यावी अशी मागणी केली. तसेच रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे.

पेंग्विनवर उधळपट्टी; जनता वाऱ्यावर

मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेवर दरवर्षी 4500 कोटी रुपये खर्च करते. त्यानंतरही नायर रुग्णालय प्रशासन / डॉक्टरांचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सुरुवातीच्या 45 मिनिटांत डॉक्टरांनी उपचार न केल्यामुळे एका दुर्दैवी चिमुकल्याचा अंत होणे ही अतिशय शरमेची बाब आहे. एकिकडे केवळ युवराजांच्या हट्टापोटी भारतीय प्राणी, पक्षी सोडून परदेशी पेंग्विनवर दररोज 1.5 लाख रुपये खर्च करण्याऱ्या सत्ताधारी पक्षाला या बालमृत्यूचे सोयरसुतक नाही ही बाब तमाम मुंबईकरांसाठी दुर्दैवी असल्याची टीका भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतरही नायर रुग्णालयात सत्ताधारी महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणीही फिरकलेसुद्धा नाहीत; साधी दखलही घेतली नाही. मुर्दाड प्रशासनाचे व सत्ताधार्‍यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी, चिंताजनक आणि निंदनीय आहे अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

सार्वजनिक आरोग्य समिती भाजप सदस्य

1. बिंदू त्रिवेदी 2. हर्षिता नार्वेकर 3. सारिका पवार 4. बिना दोषी 5.प्रियांका मोरे 6. निल सोमैया 7. अनिता पांचाळ 8. सुनीता मेहता 9. प्रकाश मोरे 10. योगिता कोळी 11. राजुल देसाई

(BJP Public Health Committee members resign in protest of negligence of administration and ruling party)

इतर बातम्या

काँग्रेसला वगळून आघाडीचा प्रयत्न भाजपालाच मदत करणारा : नाना पटोले

राज्यातील उद्योग पश्चिम बंगालमध्ये न्यायचा तर डाव नाही ना? शेलारांच्या सवालावर आता नवाब मलिकांचा पलटवार

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....