AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेचा अजब कारभार… बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई; उपमहापौरांची थेट कबुली

BMC Action Against Hawkers : बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेचा अजब कारभार... बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई; उपमहापौरांची थेट कबुली
BMC action against feriwalaImage Credit source: Google
| Updated on: Jun 01, 2026 | 5:28 PM
Share

गेल्या काही काळापासून मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झालेली आहे. यात काही बांगलादेशी फेरीवाल्यांचाही समावेश असल्याचा संशय आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेकडून फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली महाराष्ट्रातीलच फेरीवाल्यांवर कारवाई झाल्याची माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे. संजय घाडी यांनी नेमकं काय म्हटलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

फेरीवाल्यांना ओळखपत्र दिले जाणार

आज मुंबई महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत फेरीवाल्यांच्या प्रश्नांबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत 10 जूनपर्यंत सर्व अधिकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र आणि क्युआर कोड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकही अनधिकृत फेरीवाला मुंबईमध्ये राहिला नाही पाहिजे अशी महापालिकेची भूमिका आहे. त्यामुळे सर्व पात्र 1 लाख 29 हजार 4 फेरीवाले आहेत त्यांना ओळखपत्र दिले जाणार आहे अशी माहिती उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे.

बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली राज्यातील फेरीवाल्यांवर कारवाई

महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशी फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. मात्र आतापर्यंत जी कारवाई झाली त्यामध्ये कुठेही बांगलादेशी सापडलेला नाही. बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली आपल्याच देशातील, महाराष्ट्रातील अधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई झाली आहे. एकही बांगलादेशी फेरीवाला सापडला नाही अशी कबुली उपमहापौर संजय घाडी यांनी दिली आहे. याचाच अर्थ बांगलादेशी फेरीवाल्यांच्या नावाखाली राज्यातील फेरीवाल्यांनाच फटका बसला आहे.

आमदारांच्या सांगण्यावरून फेरीवाल्यांवर कारवाई करू नये – निरूपम

शिवसेना नेते संजय निरूपम यांनी फेरीबाल्यांबाबत बोलताना म्हटले की, 12 वर्ष फेरीवाल्यांबाबत नियम लागू करण्यात झालेल्या दिरंगाईला पालिका जबाबदार आहे. केवळ पात्र फेरीवाले धंदा करू लागले की हप्त्याचा प्रश्न पण संपेल. 40 टक्क्यांपेक्षा जास्त मराठी भाषिक पात्र फेरीवाले मुंबईत आहेत. बोरीवरीलच्या आमदराने बांगलादेशी फेरीवाले म्हणून रान उठवलं होतं. संजय उपाध्याय यांच्या प्रति आदर ठेवून सांगतो की गोर गरीबांच्या विचार करून कारवाई करा बांगलादेशी बोलून त्यांच्यावर कारवाई करु नये. आमदाराच्या सांगण्यावरून कारवाई होता कामा नये. आजपर्यंत एकही बांगलादेशी फेरीवाला सापडला नाही. बांगलादेशी म्हणून फेरीवाल्यांवर चुकीची कारवाई करू नका.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला.

Rain Alert : मान्सून कुठे-कुठे बसरणार? महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये पावसाची शक्यता, IMD चा अंदाज आला

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश.

रेल्वे अपघातात तिकीट न मिळाल्याने नुकसान भरपाई नाकारणे चुकीचे, SC चे व्याजासह ८ लाख रुपये देण्याचे आदेश

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण.

वकिलाचे महिला सहकाऱ्यांसोबत नको ते कांड, बिंग फुटताच… महिला वकिलांकडून बेदम मारहाण

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सर्वाधिक वेळा 90 ते 99 दरम्यान नाबाद राहणारे खेळाडू

Donald Trump :  युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ.

Donald Trump : युद्ध सुरू असतानाच ट्रम्प यांचा भारताला सर्वात मोठा धक्का, चीन, पाकिस्तानला जॅकपॉट, जगभरात मोठी खळबळ

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या.

अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या