मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली

येत्या शुक्रवारी व शनिवारी म्हणजेच दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्र किंवा नदी किनारी छटपूजा आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. पालिकेने त्याबाबतची नियमावलीच आज जारी केली आहे. (bmc bans Chhath puja celebrations in mumbai)

मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महत्त्वाच निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी व शनिवारी म्हणजेच दिनांक 20 व 21 नोव्हेंबर रोजी मुंबईत समुद्र किंवा नदी किनारी छटपूजा आणि या उत्सवाशी संबंधित कार्यक्रम करण्यास बंदी घातली आहे. पालिकेने त्याबाबतची नियमावलीच आज जारी केली आहे. (bmc bans Chhath puja celebrations in mumbai)

20 व 21 नोव्हेंबर 2020  रोजी येत असलेल्या छटपूजेच्या उत्सवानिमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी नागरिक समुद्र किनारी, तलावाच्या काठी किंवा नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच कोविडची दुसरी लाट येणाची असलेली शक्यता लक्षात घेऊन, तसेच समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी छटपूजा विषयक कार्यक्रमांचे आयोजन केल्यास शारीरिक अंतराचे पालन योग्य प्रकारे होईल, असे वाटत नाही; यामुळे छटपूजा विषयक सार्वजनिक कार्यक्रमांचे समुद्रकिनारी किंवा नदीकिनारी करण्यात येणाऱ्या आयोजनांवर नाईलाजाने प्रतिबंध घालण्यात येत आहे, असं पालिकेने म्हटलं आहे.

दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी सबंधित संस्थांना छोट्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या या महापालिकेच्या विभागस्तरावरुन देण्यात येतील. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा विविध सण साजरे करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे इत्यादीबाबत जसे सहकार्य केले, तसेच सहकार्य छटपूजेच्या वेळी देखील करावे आणि बृहन्मुंबई महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे.

महापालिकेने जारी केलेली नियमावली

  • समुद्रकिनारी छटपूजेस होणारी गर्दी लक्षात घेता ‘कोविड – 19’ मार्गदर्शक तत्त्वांचे विशेषत: सामाजिक अंतर राखणे इ. चे पालन होणार नाही, त्यानुषंगाने समुद्रकिनारी सामूहिक छटपूजेची परवानगी देण्‍यात येणार नाही. त्‍यामुळे अशा ठिकाणी भाविक जमा होणार नाहीत याची पोलीस विभागाने दक्षता घ्‍यावी.
  • छटपूजेसाठी सार्वजनिक कार्यक्रमांच्या अनुषंगाने आवश्यक त्या परवानग्या विभाग स्तरावरुन देण्यात येतील.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी स्थानिक पातळीवर पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विभाग स्तरावर ‘कोविड – 19’ करिता वैद्यकीय पथक ठेवण्यात यावे व आवश्यकतेनुसार भाविकांची चाचणी (Antigen / PCR Testing) करण्यात यावी.
  • कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात यावे.
  • अशा ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्‍लंघन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

 

संबंधित बातम्या:

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या ‘प्रगती पुस्तकात’ घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक

सावधान ! विनामास्क आढळल्यास मुंबई महापालिका पोलिसांच्या मदतीनं कारवाई करणार

(bmc bans Chhath puja celebrations in mumbai)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI