AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराबाहेर मास्क न वापरणाऱ्यांना बेड्या ठोकणार, मुंबई महापालिकेचं कडक पाऊल

घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही, तर नियमभंग करणाऱ्यांना थेट बेड्या ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत (Order to arrest for not wearing mask amid Corona).

घराबाहेर मास्क न वापरणाऱ्यांना बेड्या ठोकणार, मुंबई महापालिकेचं कडक पाऊल
| Updated on: Apr 08, 2020 | 5:18 PM
Share

मुंबई : देशभरात कोरानाचा संसर्ग वाढत असतानाच मुंबई सर्वात मोठा हॉटस्पॉट झाला आहे. देशातील सर्वाधिक घनतेच्या या शहरात तितक्याच अधिक प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. याच  पार्श्वभूमीवर कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) कडक पावलं उचलली आहेत. बीएमसीने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे. जर घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरला नाही, तर नियमभंग करणाऱ्यांना थेट बेड्या ठोकण्याचे आदेश देण्यात आले आहेत (Order to arrest for not wearing mask amid Corona).

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बीएमसीने मास्कची सक्ती करतानाच मास्कसाठी अनेक पर्यायही दिले आहेत. यात घरगुती स्वरुपाचा चांगला मास्कलाही परवानगी देण्यात आली आहे. वैयक्तिक किंवा  कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणासाठी सार्वजनिक ठिकाणी येताना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क नसल्यास संबंधिताला थेट अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आज (8 एप्रिल) हे आदेश जारी केले आहेत.

राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897’ नुसार ‘महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 2020’ अन्वये महापालिका आयुक्त यांना अनेक अधिकार देण्यात आले आहेत. याच अधिकारांचा उपयोग करुन हे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी एकमेकांपासून अंतर ठेवण्यासोबतच सर्वांनी मास्क घालणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

आदेशानुसार कोठे कोठे मास्क वापरणं बंधनकारक

  • रस्ते, रुग्णालयं, कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी 3 थराचा (3 ply) किंवा चांगल्या पद्धतीने घरी बनवलेला स्वच्छ मास्क घालणे बंधनकारक आहे.
  • वाहन चालवताना ड्राइव्हर आणि गाडीत बसलेल्या सर्वांनी मास्क घालणे आवश्यक आहे.
  • मास्क घातल्याशिवाय कुणीही बैठकांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बसू नये, उपस्थित राहू नये.
  • या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत.
  • या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी कारवाई करतील.

संबंधित बातम्या :

बीडमध्ये कोरोनाचा शिरकाव, मुंबई, पुण्यासह राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली ‘फिव्हर क्लिनिक’ संकल्पना नेमकी काय?

तब्लिगींमुळे ‘कोरोना’चा फैलाव होण्यास केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का? अनिल देशमुखांचा शाहांवर निशाणा

Corona : ‘मद्यपान केल्याने कोरोना होत नाही’, अफवेने इराणमधील 600 जणांचा मृत्यू, 3000 जण रुग्णालयात

Order to arrest for not wearing mask amid Corona

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.