BMC Election Results 2026 LIVE: मुलुंडमध्ये भाजपचा गड राहणार की विरोधक सुरुंग लावणार? प्रभाग 103 ते 108 मध्ये राजकीय स्थिती कशी?
Brihanmumbai Municipal Corporation BMC Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी मुलुंडमधील टी-वॉर्डमधील प्रभाग १०३ ते १०८ कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१७ मधील भाजपचा बालेकिल्ला, बदललेली आरक्षणे आणि प्रभागनिहाय राजकीय समीकरणांचा सविस्तर आढावा येथे वाचा.

BMC Election Results 2026 LIVE : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलुंड (T-Ward) परिसरातील प्रभाग 103 ते 108 कडे सर्वच राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. 2017 च्या निवडणुकीत हा संपूर्ण वॉर्ड भाजपचा बालेकिल्ला ठरला होता. पण यंदा प्रभाग रचना आणि बदलेली राजकीय समीकरणे यामुळे या जागांवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलुंडच्या टी-वॉर्डमधील प्रभाग 103 ते 108 मध्ये मध्यमवर्गीय वस्ती, उच्चभ्रू सोसायट्या आणि गावठाण असा संमिश्र भाग येतो.
प्रभाग क्रमांक 103 ते 108 मधील विजयी उमेदवारांची नावे
| प्रभाग क्रमांक | विजयी उमेदवार | पक्ष |
| 103 | ||
| 104 | ||
| 105 | ||
| 106 | ||
| 107 | ||
| 108 |
प्रभाग 103 ते 108 मधील राजकीय स्थिती
प्रभाग 103 : या प्रभागात तुलसी लेक, वीणानगर आणि घाटपाडा यांसारख्या महत्त्वाच्या निवासी क्षेत्रांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत भाजपचे मनोज कोटक या प्रभागातून विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या गोपीनाथ (बाबू) संसारे यांचा पराभव केला होता. 2019 मध्ये मनोज कोटक खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी हा प्रभाग सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 60,366 इतकी आहे.
Municipal Election 2026
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग 104 : या प्रभागात तांबेनगर, इंदिरानगर आणि सिद्धार्थनगर या तीन वस्त्यांचा समावेश होतो. या प्रभागाची एकूण लोकसंख्या 61,709 आहे. 2017 मध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे यांनी या प्रभागातून दणदणीत विजय मिळवला होता. यंदा हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) असल्याने पुन्हा एकदा अनुभवी नेत्यांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते. भौगोलिकदृष्ट्या हा प्रभाग मुलुंडमधील दाट लोकवस्तीचा भाग म्हणून ओळखला जातो.
प्रभाग 105 : या प्रभागात गव्हाणपाडा, नीलमनगर, सज्जनवाडी, पाटीलनगर आणि डॉ. आंबेडकरनगर या प्रमुख ठिकाणांचा समावेश होतो. 2017 च्या निवडणुकीत भाजपने येथून रजनी केणी यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी शिवसेनेच्या रसिका तोडवलकर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. या प्रभागात 52,962 लोकसंख्या आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) महिला या गटासाठी राखीव करण्यात आला आहे.
प्रभाग 106 : या प्रभागात हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी आणि नवघर या विस्तीर्ण भागाचा समावेश होतो. या प्रभागाची लोकसंख्या 49,956 इतकी आहे. 2017 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे हे या भागातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. हा प्रभाग भाजपचा सर्वात सुरक्षित गड मानला जातो. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण गटात आहे. त्यामुळे येथील राजकीय समीकरणे स्थिर राहण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग 107 : मुलुंड बेस्ट बस डेपो आणि सेंट पायस कॉलनीचा समावेश असलेला हा प्रभाग 54,879 लोकसंख्येचा आहे. 2017 मध्ये भाजपच्या समिता कांबळे यांनी शिवसेनेच्या मालती शेट्टी यांचा पराभव केला होता. हा प्रभाग आगामी निवडणुकीसाठी सर्वसाधारण गटात ठेवण्यात आला आहे. उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय मतदारांची मोठी संख्या हे या प्रभागाचे वैशिष्ट्य आहे.
प्रभाग 108 : राहुल नगर, मोतीनगर, हनुमानपाडा आणि आशानगर या वस्त्यांचा समावेश असलेल्या प्रभाग 108 ची लोकसंख्या 60,886 इतकी आहे. 2017 च्या निवडणुकीत भाजपने येथून किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी काँग्रेसच्या बालकृष्ण तिवारी यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. यंदा हा प्रभाग नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) महिला या गटासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे येथे नवीन महिला चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE
