कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची तयारी, मुंबईत कोणती जागा निश्चित?

मुंबईत पूर्व उपनगरातील कांजुर-भांडुपजवळील एक जागा कोरोनाच्या कोल्ड स्टोरेजसाठी निश्चित होत आहे.

कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची तयारी, मुंबईत कोणती जागा निश्चित?
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 6:16 PM

मुंबई : कोव्हिड लसीचे डोस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजसाठी मुंबईत तयारी सुरु करण्यात आली आहे. कांजुर-भांडुप भागात एक जागा जवळजवळ निश्चित मानण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली. (BMC finalize destination in Mumbai for COVID Vaccine cold storage)

मुंबईत शहर, पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर येथील तीन जागांचा लसीच्या कोल्ड स्टोरेजसाठी विचार सुरु आहे. मात्र पूर्व उपनगरातील कांजुर-भांडुपजवळील एक जागा निश्चित होत आहे. या जागेसाठी सुरक्षेच्या सर्व उपाय योजना, तापमान नियंत्रण या बाबींची चाचपणी करण्यात येत आहे.

मुंबईतील रिव्हर्स मायग्रेशनवर आता लक्ष देण्यात येत असल्याचंही ककाणी यांनी सांगितलं. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दिवाळीच्या काळात मुंबईत मोठ्या संख्येनं रिव्हर्स मायग्रेशन सुरु झालं आहे, म्हणजेच नागरिक परत येऊ लागले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

सप्टेंबर-ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात मुंबईतील 22 हजार घरे बंद असल्याचं समोर आलं होतं. या 22 हजार घरांवर आता प्रशासनाचं लक्ष आहे. यापैकी दोन हजार जण घरी परतले आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंतर्गत या सर्वांचं आता स्क्रीनींग केलं जाईल, अशी माहिती ककाणी यांनी दिली.

सुरुवातीला महापालिकेच्या आरोग्य सेवकांना लस देण्यात येणार आहे. तशी नोंदणी करण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात लशीच्या साठवणीसाठी कोल्ड स्टोरेज सज्ज ठेवलं जाईल. तर मुंबईत आवाजावरुन होणाऱ्या कोरोना चाचणीचा अहवाल 10 डिसेंबरपर्यंत येणार असल्याचंही सुरेश ककाणींनी सांगितलं.

पंतप्रधान मोदी पुण्यात येणार

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी कोविडशिल्ड ही लस अंतिम टप्प्यात असल्याचं सिरमचे अदर पुनावाला यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत आणि ते सिरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. (BMC finalize destination in Mumbai for COVID Vaccine cold storage)

संबंधित बातम्या :

पंतप्रधान 28 नोव्हेंबरला पुण्यात, कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

कोरोना लसीकरणाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार , आगामी अर्थसंकल्पात 500 अब्ज रुपयांची तरतूद?

(BMC finalize destination in Mumbai for COVID Vaccine cold storage)

शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?
सोलापूरच्या माळशिरसमधील मारकडवाडी गावात फेरमतदानाची का होतेय मागणी?.
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.