Mumbai Corona : मुंबईत कोरोना रुग्णांचा गृहविलगीकरणाचा काळ वाढला, वाचा काय आहेत नियम?

वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सतर्क झालंय.

Mumbai Corona : मुंबईत कोरोना रुग्णांचा गृहविलगीकरणाचा काळ वाढला, वाचा काय आहेत नियम?
bmc


मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुंबईत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सतर्क झालंय. बीएमसीच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने कोरोना बाधित मुंबईकरांसाठी गृह विलगीकरणाबाबत सुधारीत सूचना प्रसारित केल्या आहेत. त्यानुसार लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना एकूण 17 दिवसांचा गृह विलगीकरण (home quarantine) कालावधी पाळणे बंधनकारक करण्यात आलंय. त्यामध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात मुंबईतील निर्बंध कठोर होणार आहे (BMC increase home quarantine period of corona patient in Mumbai).

मुंबईत गृहविलगीकरणाचा काळ 10 दिवस की 14 दिवस?

दरम्यान काही प्रसारमाध्यमांमध्ये मुंबईत लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा गृह विलगीकरण कालावधी 14 दिवसांऐवजी 10 दिवस करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले. मात्र, ही माहिती चुकीची असल्याचं बीएमसीने स्पष्ट केलंय. तसेच उलट सुधारीत सूचनांनुसार आता एकूण 17 दिवस विलगीकरण पाळणे आवश्यक आहे, असंही बीएमसीने स्पष्ट केलंय. तसेच कुणीही प्रसार माध्यमात गैरसमज पसरू नये, असाही इशारा देण्यात आला.

गृह विलगीकरणानंतर बीएमसी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज

बीएमसी प्रशासनाने म्हटलं आहे, “लक्षणे नसलेले बाधित (asymptomatic) किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरीच विलग राहून आणि सोबत योग्य औषधोपचार घेवून लवकर बरे होवू शकतात. असे रुग्ण निर्देशित केल्यापासून 10 दिवस गृह विलगीकरणात राहिल्यानंतर त्यांना महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाच्या सल्ल्यानेच डिस्चार्ज मिळाल्याचे मानण्यात येईल.”

मुंंबईकरांना किती दिवस गृहविलगीकरणात राहावं लागणार?

“डिस्चार्जसाठी संबंधित रुग्णाने त्यांच्या विभागाच्या वैद्यकीय अधिकारी (आरोग्य) पथकाकडे 10 दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृतीबाबत अद्ययावत माहिती देणे आवश्यक राहील. त्यानंतर त्याने इतर सर्व रुग्णांप्रमाणेच पुढील 7 दिवस गृह विलगीकरण पाळणे आवश्यकच आहे,” असंही नमूद करण्यात आलंय.

“अशा प्रकारे मुंबईकरांना एकूण 10 अधिक 7 असे एकूण 17 दिवस गृह विलगीकरण कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही सूट दिलेली नाही. विलगीकरण कालावधी योग्यरीत्या पाळून सहकार्य करावे,” असं आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याच्यावतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले.

हेही वाचा :

महाराष्ट्र जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना हॉटस्पॉट, तर आशिया खंडात एकट्या महाराष्ट्रात भीषण उद्रेक

2025 पर्यंत प्रत्येक 10 पैकी 6 जण नोकर्‍या गमावतील; WEF च्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Maharashtra ssc hsc Exam : पहिली ते आठवी सरसकट पास, नववी ते बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय?

व्हिडीओ पाहा :

BMC increase home quarantine period of corona patient in Mumbai

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI