आपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना

बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्याला तयार झालीय. याच अनुषंगाने आज (24 जुलै) बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथकं रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत.

आपत्कालीन प्रसंगी बीएमसीकडून मदतीचा हात, एक पथक रायगडला, तर दुसरं कोल्हापूरच्या दिशेने रवाना
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 2:31 AM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्याला तयार झालीय. याच अनुषंगाने आज (24 जुलै) बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथकं रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.

“2 वैद्यकीय चमू, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉटरी”

मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉटरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

रायगड आणि कोल्हापूरकडे पथकं रवाना

कोल्हापूर येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेची आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठविण्यात आली आहे. महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.

कोल्हापुरात बीएमसीकडून अहोरात्र मेहनत

सन 2019 मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते.

हेही वाचा :

कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालाड मधील डी मार्ट सील

कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या 390 नागरिकांचंही लसीकरण होणार, पालिकेकडून अॅक्शन प्लॅनची घोषणा

मुंबईकरांना दिलासा, तानसा, मोडकसागर ओव्हर फ्लो, सात तलावांमध्ये 53 टक्के जलसाठा

व्हिडीओ पाहा :

BMC send two teams to Raigad and Kolhapur for flood relief work

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.