कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या 390 नागरिकांचंही लसीकरण होणार, पालिकेकडून अॅक्शन प्लॅनची घोषणा

कांदिवलीमध्ये (पश्चिम) हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण होऊन जवळपास 390 नागरिकांची फसवणूक झाली. त्यानंतर आता या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत लस दिली जाणार आहे.

कांदिवलीत बनावट लस मिळालेल्या 390 नागरिकांचंही लसीकरण होणार, पालिकेकडून अॅक्शन प्लॅनची घोषणा
कोरोना लसीकरण


मुंबई : कांदिवलीमध्ये (पश्चिम) हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलात खासगी स्तरावर बनावट लसीकरण होऊन जवळपास 390 नागरिकांची फसवणूक झाली. त्यानंतर आता या नागरिकांना बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून अधिकृत लस दिली जाणार आहे. त्यासाठी शनिवारी (24 जुलै 2021) रोजी कांदिवलीमध्ये (पश्चिम) महावीर नगर परिसरातील अॅमिनिटी मार्केट महानगरपालिका लसीकरण केंद्रावर लसीकरणाचं नियोजन करण्यात आलं आहे.

दरम्यान, मुंबईत आढळलेल्या 9 बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलीसांकडून महानगरपालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरित्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरु आहे. कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृह संकुलाने खासगीरित्या लसीकरण दिनांक 30 मे 2021 रोजी आयोजित केले होते. मात्र, सदर लसीकरण बनावट आणि अनधिकृत पद्धतीने झाल्याची बाब नंतर उघडकीस आली. त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी चौकशी देखील सुरु केली.

“एकूण 9 बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार”

या प्रकरणी धागेदोरे हाती लागल्यानंतर अशाच रितीने एकूण 9 बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे आणि त्यात अनेक नागरिकांना बनावट / अनधिकृत लस दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात हाती आली. सदर लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. अनधिकृत आणि अनुचित पद्धतीने करण्यात आलेल्या या सर्व गोष्टींची पोलीसांनी सखोल चौकशी केली आहे.

पोलिसांनी महानगरपालिका प्रशासनाकडे यादी सोपवली

पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पोलीसांनी महानगरपालिका प्रशासनाकडे सोपविली आहे. कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून पडताळण्यात येत आहे.

बनावट लस दिलेल्यांना अधिकृत लस देण्यात येणार

पडताळणीअंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सीन असल्यास 28 दिवसांनंतर / कोविशील्ड असल्यास 84 दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. तर, ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे.

बनावट आणि अनधिकृत पद्धतीने खासगी स्तरावर लसीकरण झालेल्या या सर्व नागरिकांना न्याय्य व योग्य पद्धतीने अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक तेथे राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील मंजुरी घेण्यात येत आहे.

हेही वाचा :

कांदिवली पाठोपाठ नवी मुंबईतही बोगस लसीकरण, डॉ. मनीष त्रिपाठीसह 2 जणांवर गुन्हा दाखल

केंद्राने राज्य सरकारला अंधारात ठेवल्यानेच लसीकरणाचा बोगसपणा, नवाब मलिकांचा आरोप

बोगस लसीकरण प्रकरणी मुंबईतल्या कांदवलीतील शिवम हॉस्पिटलवर मुंबई महापालिकेची कारवाई

व्हिडीओ पाहा :

BMC going to give Corona vaccination who get bogus vaccine in Kandivali

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI