वाफ घेतल्याने कोरोना संसर्गाचा धोका कमी, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अभ्यासात दावा

स्टीम थेरपीमुळे कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो असा दावा बीएमसीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील अभ्यासात करण्यात आलाय (Corona claim on steam therapy).

वाफ घेतल्याने कोरोना संसर्गाचा धोका कमी, मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या अभ्यासात दावा
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jul 28, 2020 | 10:26 AM

मुंबई : स्टीम थेरपीमुळे कोरोनाच्या लक्षणांवर परिणाम होतो आणि कोरोनाच्या संसर्गाचा धोकाही कमी होतो असा दावा मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासात करण्यात आला आहे (BMC seven hills hospital Corona claim on steam therapy). विशेष म्हणजे हा अहवाल इंडियन मेडिकल गॅजेटमध्ये देखील प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही काहिशी दिलासादायक बातमी आहे. आगामी काळात इतर रुग्णांना देखील स्टीम थेरपीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरु नये किंवा तो कमी व्हावा यासाठी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर दिला जातो. त्यासाठी अनेक घरगुती उपायही केले जात आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे स्टीम थेरेपी. यावर मुंबई महानगरपालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांनी अभ्यास केला आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

या अभ्यास अहवालानुसार या स्टीम थेरपीचा कोरोनाची लक्षणं आणि संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी उपयोग होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा अहवाल इंडियन मेडिकल गॅजेटमध्ये देखील प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे याची विश्वासार्हताही अधिक असल्याचं बोललं जात आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कोरोनाची लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणं असलेले आणि अजिबात लक्षणं नसलेल्या अशा सर्वांना प्रतिबंधकात्मक उपाय म्हणून स्टीम घेणे गूणकारी ठरु शकते. हे संशोधन पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील डॉक्टरांच्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्गावर झालेल्या रुग्णांना गरम पाण्याची वाफ गूणकारी ठरेल, असं पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयातील संशोधनात म्हटलं आहे.

हेही वाचा :

उपासमारीची वेळ आली, आता नाट्य-सिनेमागृहं 1 ऑगस्टपासून सुरु करा, पुण्यातील कलाकारांच्या संस्थांची मागणी

अवाजवी बिलांच्या तक्रारीची दखल, मिरा रोडमधील हॉस्पिटलची ‘कोव्हिड’ मान्यता रद्द

Pune Corona | 31 जुलैपर्यंत पुण्यात 60 हजार कोरोना रुग्ण असतील, अतिरिक्त आयुक्तांची माहिती

BMC seven hills hospital Corona claim on steam therapy

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें