मुंबईत कोरोनाबाधितांना बेड्स उपलब्ध करण्यासाठी ‘वॉर्डनिहाय वॉर रुम’, वैशिष्ट्यं काय?

मुंबईत कोरोनाबाधितांना बेड्स उपलब्ध करण्यासाठी 'वॉर्डनिहाय वॉर रुम', वैशिष्ट्यं काय?

तातडीने आणि विकेंद्रीत पद्धतीने बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच ‘वॉर्ड वॉर रुम’ सुरु करण्यात येणार (Corona Ward-Wise War Room Mumbai) आहे.

Namrata Patil

|

Jun 08, 2020 | 8:57 AM

मुंबई : कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत (Corona Ward-Wise War Room Mumbai) आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात बेड मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत एक हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आला होता. कोरोना रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या मुख्य नियंत्रण कक्षातील 1916 या हेल्पलाईनबाबत अनेक तक्रारी येत होत्या. ही रुग्णसंख्या वाढल्यानं या क्रमांकावरचा ताणही वाढला होता. यावर उपाय म्हणून तातडीने आणि विकेंद्रीत पद्धतीने बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच ‘वॉर्ड वॉर रुम’ सुरु करण्यात येणार आहे.

यात विकेंद्रित पद्धतीने रुग्णालय खाटा व्यवस्थापन प्रणाली (Decentralized Hospital Bed Management) अंमलात आणली जाणार आहे. त्यासाठी विभाग कार्यालयांच्या पातळीवर वॉर्ड वॉर रुम्स म्हणजे विभागीय नियंत्रण कक्ष लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह सहल यांनी दिले आहेत.

ही वॉर्ड वॉर रुम सुरु केल्यानंतर त्यांचे संपर्क क्रमांक प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे आणि इतर संपर्काच्या माध्यमांतून मुंबईकरांपर्यंत देण्यात येणार आहेत.

कशी असेल वॉर्डनिहाय वॉर रुम

  • महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालय स्तरावर हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करायचा आहे.
  • विभाग स्तरावरील ‘वॉर्ड वॉर रूम’ मधून कोरोना बाधित रुग्णांसाठी बेडचे व्यवस्थापन केले जाणार आहे.
  • प्रत्येक ‘वॉर्ड वॉर रूम’ मध्ये दिल्या जाणाऱ्या दूरध्वनी क्रमांकाच्या 30 वाहिन्या असतील.
  • 24×7 तत्वावर तीन सत्रांमध्ये अखंडपणे कार्यरत राहणाऱ्या या कक्षांमध्ये वैद्यकीय अधिकारी, आवश्यक इतर कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
  • दररोज कोरोना बाधित रुग्णांची यादी प्राप्त झाल्यानंतर ‘वॉर्ड वॉर रूम’ मधील डॉक्टर या रुग्णांशी संपर्क साधून, त्यांना असलेल्या बाधेचे स्वरुप समजावतील
  • त्यानंतर संबंधित रुग्णास घेऊन कोविड आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयामध्ये योग्य आणि आवश्यक बेड मिळवून देण्याची जबाबदारी पार (Corona Ward-Wise War Room Mumbai) पाडतील.

संबंधित बातम्या : 

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीसाठी गुडन्यूज, रुग्णवाढीच्या वेगात कमालीची घट

मुंबईकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें