मुंबईकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

मुंबईत अद्याप कोरोना साथीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नसले तरी या विषाणूची लागण होण्याचा वेग मंदावत चालला (Mumbai Corona Patient Growth Rate Decrease) आहे.

मुंबईकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना रुग्णवाढीच्या प्रमाणात घट

मुंबई : मुंबईत अद्याप कोरोना साथीवर पूर्ण नियंत्रण मिळवता आले नसले तरी या विषाणूची लागण होण्याचा वेग मंदावत चालला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत असलेले दररोज 6.62 टक्के रुग्णवाढीचे प्रमाण आता 3.50 टक्क्यांवर आले आहे. ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण दहा टक्क्यांवरुन 1.6 ते 2.4 टक्के इतका खाली आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे. (Mumbai Corona Patient Growth Rate Decrease)

मुंबईत मे महिन्यात कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे मुंबईतील विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत असल्याने पालिकेने अधिक उपाययोजना राबण्यात सुरुवात केली होती.

सद्यस्थितीत वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, सायन, सांताक्रुझ, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्णवाढ कमी होत चालली आहे.

सध्या धारावी, दादर, माहिम या भागांतील रुग्णवाढीचा दर 2.4 टक्के इतका खाली आला आहे. या भागांत आतापर्यंत मुंबईतील पालिकेच्या सर्व विभागांच्या तुलनेत कोरोनाचे सर्वाधिक 3200 रुग्ण सापडले आहेत. पण आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे.

रुग्णवाढ प्रमाण कमी झालेले विभाग

  • ई विभाग – भायखळा-1.6 टक्के
  • जी-उत्तर – धारावी – 2.4 टक्के
  • जी-दक्षिण- वरळी – 2.2 टक्के
  • एच-पूर्व – वांद्रे – 2.3 टक्के
  • ए विभाग – कुलाबा – 2.7 टक्के
  • डी विभाग – ग्रँट रोड – 2.6 टक्के
  • एफ-उत्तर – माटुंगा – 1.9 टक्के

प्रभादेवी भागात रुग्णवाढीचा दर हा 2.2 टक्के इतका कमी झाला आहे. या भागात आतापर्यंत 2200 रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड आणि कुलाबा विभागातील रुग्णवाढीचा दर हा अनुक्रमे 2.6. आणि 2.7 टक्के इतका कमी झाल्यचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तर घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मुलुंड व भांडूप या विभागातील रुग्णवाढीचा दर कमी मागील आठवड्याभरापासून कमी होत चालला आहे. सध्या या भागात रुग्णवाढीचा दर 4.5 ते 6.7 इतका आहे.

मुंबईत शुक्रवारी सर्वाधिक 7.4 टक्के रुग्णवाढ पी-उत्तर मालाड विभागात नोंदवण्यात आली. दहिसर विभागात सुरुवातीला शहरातील अन्य विभागांपेक्षा जास्त रुग्णवाढ होती. ती खाली येत 6.4 टक्के इतकी झाली आहे. घाटकोपरला रुग्णवाढीचा दर 4.5 इतका आहे. तर पश्चिम उपनगरात मालाड ते दहिसरपर्यंत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. (Mumbai Corona Patient Growth Rate Decrease)

संबंधित बातम्या : 

97 वर्षाच्या आजीची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, केवळ सात दिवसात डिस्चार्ज

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *