AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मोडतो. (No E Pass Needed In MMR)

मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही
| Updated on: Jun 05, 2020 | 8:42 AM
Share

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) येणाऱ्या नागरिकांना राज्य सरकारने अंतर्गत प्रवासाची परवानगी दिली आहे. म्हणजेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली भागातील रहिवाशांना एमएमआर भागात प्रवासासाठी आता ई-पासची आवश्यकता नाही. (Maharashtra Allows Inter-District Movement in MMR No E Pass Needed In Mumbai Metropolitan Region)

गुरुवारी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारने एमएमआरमधील नागरिकांच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी दिली. तर राज्यात इतरत्र आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासाचे नियम कायम राहतील, असेही यात नमूद केले आहे.

जवळपास 56 हजार रुग्णसंख्या असलेल्या मुंबई महानगर प्रदेशाला ‘कोरोना’चा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्याचा संपूर्ण भाग, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याचा काही भाग मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मोडतो.

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या महापालिका

मुंबई ठाणे कल्याण-डोंबिवली नवी मुंबई पनवेल वसई-विरार मीरा-भाईंदर भिवंडी-निजामपूर उल्हासनगर

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नगर परिषद

अंबरनाथ बदलापूर उरण अलिबाग पेण माथेरान कर्जत खोपोली पालघर

एमएमआर क्षेत्राअंतर्गत येणारे जिल्हे

मुंबई शहर (पूर्ण) मुंबई उपनगर (पूर्ण) ठाणे (पूर्ण) पालघर (आंशिक) रायगड (आंशिक)

मैदानी शारीरिक व्यायामांचा भाग म्हणून बागा आणि ओपन एअर जिम चालवण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्य सरकारने म्हटले आहे.

हेही वाचा : राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?

दुसर्‍या टप्प्यात, सम-विषम पद्धतीने गल्ली किंवा रस्त्याच्या एका बाजूला असलेली सर्व दुकाने एका दिवशी 9 ते 5 या वेळेत उघडतील, तर दुसर्‍या दिवशी रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला असलेली सर्व दुकाने खुली राहतील.

(Maharashtra Allows Inter-District Movement in MMR No E Pass Needed In Mumbai Metropolitan Region)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.