Mumbai Corona | मुंबई महापालिका कोरोना संसर्गाविरुद्ध अ‌ॅक्शन मोडमध्ये, मिशन धारावी सुरु

मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मिशन धारावी सुरु केले आहे. कोरोना चाचणीसाठी शिबीर घेण्यात येणार आहे. BMC Mission Dharavi

Mumbai Corona | मुंबई महापालिका कोरोना संसर्गाविरुद्ध अ‌ॅक्शन मोडमध्ये, मिशन धारावी सुरु
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 1:23 PM

मुंबई:  मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत चाललीय. मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून मिशन धारावी सुरु केले आहे. महापालिकेने दादर, माहीम ,धारावीत पुन्हा एकदा कोरोना विरोधात मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. आजपासून दहा ठिकाणी कोरोना चाचण्यांची शिबीर घेतली जाणार आहेत. ( BMC started Mission Dharavi for stop corona virus spread in Dharavi )

मुंबई महापालिकेकडून (BMC) शहरामध्ये 244 ठिकाणी मोफत कोरोना चाचणी सुरू असताना धारावी , दादर , माहीममध्ये विशेष कोरोना चाचणी शिबीर घेण्यात येणार आहेत.  मोफत कोरोना चाचणी तपासणी शिबीर 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबरला ही घेण्यात येणार आहेत.  धारावीतील कोरोना रुग्णसंख्या मुंबई महापालिकेने केलेल्या योग्य नियोजनामुळे नियंत्रणात आली होती.  धारावीतील  (Dharavi)कोरोना रुग्णसंख्येंवर नियंत्रण मिळवल्याबद्दल मुंबई महापालिकेचे जागतिक आरोग्य संघटनेने देखील कौतुक केले होते. आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

आशिया खंडातील मोठी झोपडपट्टीत पहिल्या टप्प्यात कोरोना संख्या वाढलं होती. पण योग्य नियोजनामुळे कोरोना नियंत्रणात आला होता. मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. आता पुन्हा एकदा धारावी , दादर , माहीम कोरोना वाढू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ( BMC started Mission Dharavi for stop corona virus spread in Dharavi )

नेमक्या काय केल्या जात आहेत उपाययोजना

मुंबई महापालिकेद्वारे माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या दरम्यान नागरिकांची आरोग्य तापसणी, कोरोना चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. लोकांच्या संपर्कात येणाऱ्या दुकानदार , फेरीवाले , हॉटेल कर्मचारी , फुल मार्केट व्यापारी यांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.

कोरोनाच्या सर्व समूह तपासण्या, चाचणी शिबीरांचे आयोजन, पालिकेचे दवाखाने येथे टेस्ट घेतल्या जात आहेत. कोरोनाची दुसरी लाट आली तर कोविड सेंटर सज्ज आहेत. नागरिकांनी मास्क घालावेत यासाठी प्रबोधन केल जात आहे , मास्क न घालणाऱ्या लोकांवर दंड लावला जात आहे. मंदिर आणि धार्मिक स्थळं खुली झाल्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे मंदिर आणि धार्मिक स्थळांमधील पुजाऱ्यांच्या ही टेस्ट केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा हळूहळू वाढ

16 नोव्हेंबर : 409 17 नोव्हेंबर : 541 18 नोव्हेंबर : 871 19 नोव्हेंबर : 924 20 नोव्हेंबर : 1031 21 नोव्हेंबर : 1092

संबंधित बातम्या: 

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा चढता क्रम, पाच दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

( BMC started Mission Dharavi for stop corona virus spread in Dharavi )

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.