AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking: सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांना जामीन (Bail) मंजूर केला आहे.

Breaking: सुधा भारद्वाज यांना मोठा दिलासा, मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
सुधा भारद्वाज
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 1:11 PM
Share

मुंबई: मुंबई हायकोर्टानं (Bombay High Court) सुधा भारद्वाज (Sudha Bharadwaj) यांना जामीन (Bail) मंजूर केला आहे. 2018 मध्ये झालेल्या कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणी (Koregaon Bhima Case) सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि एन. जे. जमादार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, इतर आठ जणांचे जामिनाचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. तर, मुंबई हायकोर्टानं सुधीर ढवळे, वरवरा राव, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, वेर्नन गोन्सालवीस, अरुन फरेरिरया यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहेत.

जामीन मिळाला असला तरी सुटकेसाठी 8 दिवस लागणार

सुधा भारद्वाज यांना मुंबई हायकोर्टानं जामीन दिला असला तरी त्यांना 8 डिसेंबरला विशेष एनआयए कोर्टापुढं जामीनाच्या आदेशासाठी हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबई हायकोर्टानं सुधा भारद्वाज यांच्या जामीन अर्जावरील निर्णय 4 ऑगस्टला प्रलंबित ठेवला होता. तर, इतरांच्या जामीन अर्जाचा निर्णय 1 सप्टेंबरला राखीव ठेवण्यात आला होता.

कोरेगाव भीमा हिंसा प्रकरणात यूएपीए लागू करण्यात आल्यानं पुणे सत्र न्यायालयात सुनावणी करता येणार नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. कोरेगाव भीमा येथील लढाईला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तिथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या जवळपासच्या परिसरात 1 जानेवारी 2018 हिंसाचार झाला होता.

कोण आहेत सुधा भारद्वाज?

सुधा भारद्वाज या गेल्या 25 वर्षांपासून छत्तीसगडमधील कामगार संघटनांशी संबंधित आहेत. पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज च्या छत्तीसगडच्या जनरल सेक्रेटरी आहेत. लैंगिक अत्याचार आणि राज्य दमन विरोधी महिला गटामध्ये त्या कार्यरत् आहेत. आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थी असून नॅशनल लॉ विद्यापीठ दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून सुधा भारद्वाज यांनी काम केलं आहे. अमेरिकेचं नागरिगत्व सोडून देत त्यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. छत्तीसगडमधील विलासपूर भागातील आदिवासींच्या हक्कासाठी त्या लढण्याचं काम करत होत्या.

इतर बातम्या:

ऊन, वारा, पावसातही संप सुरूच… 22 दिवस एसटी ठप्प, 8195 निलंबित, 1827 कर्मचाऱ्यांना काढले; विलीनीकरणावर चाक अडलेलेच!

Mumbai Rains : अवकाळी पावसानं मुंबईकरांची तारांबळ, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, राजधानीसह पालघरमध्ये पाऊस सुरु

Bombay High Court Grants default bail to Sudha Bharadwaj in Koregaon Bhima case

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.