AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rains : अवकाळी पावसानं मुंबईकरांची तारांबळ, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, राजधानीसह पालघरमध्ये पाऊस सुरु

हवामान विभागानं जारी केलेल्या अ‌ॅलर्ट प्रमाणं मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी सकाळी पावसानं सुरुवात केल्यानं छत्री आणि कोट शिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

Mumbai Rains : अवकाळी पावसानं मुंबईकरांची तारांबळ, हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, राजधानीसह पालघरमध्ये पाऊस सुरु
मुंबईत पाऊस
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 11:48 AM
Share

मुंबई: भारतीय हवामान विभागानं (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत पावसाला (Mumbai Rains) सुरुवात झाली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या (Arabian Sea Low Pressure Area) पट्ट्यामुळं मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्याला यलो अॅलर्ट देण्यात आलाय तर पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. मुंबईच्या काही भागात सकाळपासूनचं पावसाला सुरुवात झाली आहे. परळ, लोअर परेल, गोरेगाव, मालाड भागात पावसानं हजेरी लावली आहे.

मुंबई आणि पालघरमध्ये पावसाला सुरुवात

हवामान विभागानं जारी केलेल्या अ‌ॅलर्ट प्रमाणं मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी सकाळी पावसानं सुरुवात केल्यानं छत्री आणि कोट शिवाय बाहेर पडलेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. तर, पालघरमध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. आयएमडीनं पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट दिला आहे. पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. पालघर , बोईसर , डहाणू भागात पावसाची संततधार सुरु झालीय. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे.

वसई विरारमध्ये काही भागात हलक्या सरी

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पहाटे पासूनच परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत 1 डिसेंबरलाला पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं वसई विरारमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झालीय. आज वसई विरारच्या काही भागात हलका पाऊस पडत आहे. नालासोपारा पूर्व संयुक्त नगर परिसरात पाऊस झाला.

पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागानं हवामानाचा अंदाज जारी केला असून पालघर, नाशिक, धुळे नंदुरबारला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्याला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

इतर बातम्या:

Weather Alert: मराठवाड्यासह राज्यावर पावसाचे ढग, दोन दिवस वातावरण ढगाळ, नंतर कडाक्याची थंडी!

मोक्कार पावसाची नाशिकमध्ये हजेरी, द्राक्ष बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला, साहित्य संमेलनावरही सावट!

Weather Forecast unseasonal rain started in Mumbai and Palghar as per IMD Prediction

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.