AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cabinet Meeting पूर्वीच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर, कुणाला फायदा होणार?

Cabinet Meeting : महाराष्ट्रात अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या कॅबिनेट बैठक सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर झाली आहे.

Cabinet Meeting पूर्वीच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता; पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर, कुणाला फायदा होणार?
खरीप 2025
| Updated on: Sep 23, 2025 | 1:27 PM
Share

महाराष्ट्रात अतिवृष्टीने 70 लाख एकरवरील पीक हातचं गेलं आहे. तर अनेक गावात पूरस्थिती आहे. शाळा, घराचं मोठं नुकसान झालं आहे. सध्या कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) सुरू आहे. पण त्यापूर्वीच एक मोठी वार्ता येऊन ठेपली आहे. पीक नुकसानीसाठी 2,215 कोटींची मदत जाहीर झाली आहे. पीक नुकसानीसाठी मदत म्हणून 31.64 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल. मदत व पूनर्वसन विभागाने याविषयीचा शासन निर्णय जाहीर केला. खरीप 2025 (Kharip 2025) साठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी

राज्यात विदर्भ, मराठवाड्यात पावसाने हाहाकार घातला आहे. पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांना पावसाने तडाखा दिला आहे. त्याचा आढावा सरकार सातत्याने घेत होतं. यापूर्वी विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. तर आता विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले आहे. यापूर्वीच्या नुकसानीचे आणि आताचे पंचनामे हे युद्धपातळीवर करण्यात येत आहे. आतापर्यंत जी आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार 32 लाख शेतकऱ्यांचं मोठं नुकसान राज्यात झाले आहे.

त्यासाठी 2,215 कोटींच्या मदतीला मंजूरी देण्यात आली आहे. हा निधी आजच शेतकऱ्यांच्या खात्यात वळता करता येईल. यामध्ये विदर्भातील काही जिल्ह्यांचा आणि मराठवाड्यातील धाराशिवसह नांदेड आणि बीडमध्ये मुसळधार पावसाने नुकसान झालेल्या पट्ट्याचा समावेश आहे. तर आता पावसामुळे जे नुकसान झाले आहे. त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वारंवार विरोधी पक्ष करत आहेत. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानग्रस्त गावांची, जिल्ह्यांची विभागवार आकडेवारी तयार करण्यात आली आहे. युद्धपातळीवर ही मदत आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. अनेक भागात अद्यापही पाणी आहे, त्यामुळे तिथे पंचनामे झालेले नाहीत. पाणी ओसरल्यावर याठिकाणचे पंचनामे करण्याचे कामही करण्यात येणार आहे.

1,339 कोटींची मदत जाहीर

दरम्यान सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. जून 2025 ते ऑगस्ट 2025 या दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना राज्य सरकार 1 हाजर 339 कोटींची मदत देणार आहे. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. जून ते ऑगस्ट 2025 या काळात जे पंचनामे केले, त्याआधारे ही मदतीची घोषणा करण्यात आली आहे. तर बीड, धाराशिवसह काही जिल्ह्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहेत. हेलिकॉप्टरच्या मदतीने पूरात अडकलेल्या गावातील नागरिकांची सुटका करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Follow Us
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?